House help husband viral video : नात्यात प्रेम असलं तर ते व्यक्तही करता यायला हवं, असा अनेकांचा आग्रह असतो. मात्र, प्रत्येकालाच प्रेम शब्दांत व्यक्त करता येईल असं नाही. काही जण आपल्या कृतीतून प्रेमाची जाणीव करून देतात. तिने भाजी बनवली तर त्याने ती साफ करून द्यावी, तिने केर काढला तर त्याने अंथरूण घालून द्यावं, अशा एकमेकांच्या छोट्या-मोठ्या कामात मदत करणं, हाच प्रेम व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग ठरू शकतो. असाच काहीसा संदेश देणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये घरकाम करणाऱ्या एका महिलेची प्रकृती ठीक नसताना तिच्या पतीने केलेली कृती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

इन्स्टाग्राम युजर पूर्णा श्रीवत्सा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक जोडपे स्वयंपाकघरात एकत्र काम करताना दिसत आहे; यात पती आपल्या पत्नीला तिची काही कामे करण्यात मदत करतो आहे. त्या घरकाम करणाऱ्या महिलेची प्रकृती ठीक नव्हती म्हणून तिचा पती तिच्यासोबत कामावर आला आणि त्याने तिची कामे करण्यात मदत केली. कामावर येण्यापूर्वी त्या महिलेने त्यांना आपली प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले नव्हते. प्रकृती ठीक नसल्याचे समजल्यावर त्यांनी तिला विश्रांती घेण्यास सांगितले होते.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @purnasrivatsa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “घरकाम करणाऱ्या महिलेची प्रकृती ठीक नव्हती, म्हणून तिचा पती तिला मदत करण्यासाठी बरोबर आला होता. हे किती छान आहे ना? मला तर हे एखाद्या रिलेशनशिप गोल्सचे उदाहरण वाटले’ ; अशी कॅप्शन दिली आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

पण सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही लोकांनी ही कृती योग्य होती का, असा प्रश्न उपस्थित केला. यावर आलेल्या काही प्रतिक्रियांना उत्तर देताना श्रीवत्सा यांनी नंतर या व्हिडीओमागची खरी पार्श्वभूमी सांगितली. त्यांच्या मते, महत्त्वाची गोष्ट ही नव्हती की, त्या महिलेसोबत तिचा पती आला होता. तर जेव्हा तिला मदतीची गरज होती, तेव्हा फक्त क्त ‘मी तुझ्या पाठीशी आहे’ असं म्हणत नाही, तर आपल्या कृतीतूनही त्याची साथ आणि प्रेम दाखवून देतो. ही गोष्ट अधिक महत्त्वाची होती.

पण, काही नेटकरी व्हिडीओ पाहून ‘केवळ तोंडी आधार देण्यापेक्षा पत्नीला मदत दाखवली हे पाहून कौतुक केले’, ‘घरगुती कामात मदत करण्यासाठी जोडीदाराला दुसऱ्याच्या घरी घेऊन जाणे ही परिस्थिती हाताळण्याची योग्य पद्धत होती का’, ‘असा जोडीदार मिळणं हे त्या महिलेसाठी खरोखरच खूप भाग्याचं आहे’ ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसत आहेत.