Viral Video House Owner’s Sweet Surprise For Housemaids : घर सांभाळणारी मोलकरीण कुटुंबाचा अविभाज्य घटक असतात. मोलकरीण एक दिवस जरी आली नाही, तर घरातील महिला आणि एकूणच कुटुंबांचे हाल होतात. स्वतःच्या घरातील कामं आवरून दुसऱ्यांच्या घरी जाऊन भांडी घासणे, लादी पुसणे, कपडे धुणे, घर स्वच्छ ठेवणे ते घरातील लहान बाळांना सांभाळणे आदी गोष्टी त्या अगदी मोठ्या मानाने करीत असतात. तर, आज अशाच घरकाम करणाऱ्या दोन तरुणींना घरमालकिणीने दिवाळीचे जबरदस्त गिफ्ट दिले आहे, जे पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल.

दिवाळीनिमित्त कोणी आपल्याला नवीन कपडे किंवा एखादी भेटवस्तू जरी आणून दिली, तर आपल्याला नकळत भरपूर आनंद होतो. तर, आज घरमालकिणीने घरकाम करणाऱ्या मोलकरणीच्या चेहऱ्यावर हाच आनंद बघण्यासाठी त्यांना दिवाळीचे गिफ्ट दिले आहे. व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे घरमालकिणीने घरकाम करणाऱ्या दोन तरुणींसाठी कर्णफुले बनवून घेतली आहेत. व्हिडीओत कानातल्यांचा बॉक्स दाखवून, ती घरकाम करणाऱ्या तरुणींकडे जाते. एवढं मोठं आणि मौल्यवान गिफ्ट पाहून तिच्या अश्रूंचा बांध फुटतो.

मालकिणीच्या रूपात लाभलंय गोडं नातं (Viral Video)

मग मोलकरणीला भावूक झालेले पाहून मालकीण तिला मिठी मारते. त्यानंतर दरवाजा उघडून दुसरी घरकाम करणारी तरुणी येते. तीसुद्धा कानातले पाहून भरपूर खुश होते. घरमालकीण दोन्हीही घरकाम करणाऱ्या तरुणींच्या कानात कर्णफुले घालते आणि अशा प्रकारे दिवाळीचे त्यांना खास गिफ्ट देते. आपल्याप्रमाणे इतरांनीही दिवाळी अगदी आनंदात साजरी करावी यासाठी घरमालकिणीने हा अट्टहास केला आहे, असे म्हणायला हरकत नाही. एकदा बघाच हा भावूक करणारा व्हायरल व्हिडीओ…

व्हिडीओ बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @harika_kudikala या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरीसुद्धा व्हिडीओ पाहून “तुमच्यासारखी माणसं या जगात असली पाहिजेत”, “हे खरंच प्रेरणादायी होतं. मला एक छोटा सल्ला द्यायचा होता. तिच्या प्रायव्हसी आणि भविष्यासाठी चांगलं होईल. जर तुम्ही तिचा चेहरा पूर्णपणे ब्लर करा”, “दोघींनाही मालकिणीच्या रूपात छान नातं लाभलं आहे”, “व्हिडीओ पाहून चटकन डोळ्यांत पाणी आले” आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्याचे दिसत आहेत.