Mumbai Dabbawalas Viral Video : सध्या प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन आहे. त्याचा वापर करून आपण अगदी सर्रास विविध फूड डिलिव्हरी ॲपवरून खाद्यपदार्थ मागवीत असतो. त्यामुळे या सेवेवर अगदी कॉलेजचे विद्यार्थी, गृहिणी आणि नोकरदार वर्ग सुद्धा मोठ्या संख्येयवर अवलंबून असतो. पण, वेळेवर आणि विश्वासाने फक्त घरचा डबा पोहोचवणारे मुंबईचे डबेवाले तुम्हाला आठवतायंत का?

पांढरा शर्ट, डोक्यावर टोपी, सायकल आणि सायकलला लावलेले घरचे जेवणाचे डब्बे असा काहीसा मुंबईच्या डबेवाल्यांचा लूक असतो. तर हे मुंबईतील डबेवाले अनेक वर्षांहून अधिक काळापासून ही सेवा सायकल, बाईक, हातगाडी, मुंबई लोकलद्वारे पुरवत आहेत. मुंबईतल्या नोकरदारांचं दुपारचं जेवण हे मोठ्या प्रमाणात या डबेवाल्यांवर आजही अवलंबून आहे. तर हे मुंबईचे डबेवाले नक्की काम कसं करतं असतील असा प्रश्न तुमच्याही मनात आहे का? तर तुम्हाला या बातमीतून कदाचित त्याच उत्तर मिळेल.

तर इन्स्टाग्राम युजर @ifreightbox.scm ला या मुंबईच्या डबेवाल्यांना भेटण्याची संधी मिळाली आणि त्याचा संपूर्ण अनुभव कॅप्शनमध्ये लिहिला. मुंबईच्या डबेवाल्यांबरोबर उभं राहून, त्यांचा प्रवास आण, काम करण्याची पद्धत समजून घेतल्या. तेव्हा त्याला एक गोष्ट स्पष्ट झाली की, खरं यश केवळ तंत्रज्ञानावर नाही, तर शिस्त, योग्य पद्धतींवर अवलंबून असतं. ही मंडळी दररोज २ लाखांपेक्षा जास्त डबे, किंचितही चूक न करता (99.9999%) नोकरदारवर्गापर्यंत पोहोचवतात. विशेष म्हणजे हे काम जीपीएस, सॉफ्टवेअर किंवा ऑटोमेशन शिवाय करतात. त्यामुळे यांच्या यशामागची मुख्य कारणं म्हणजे काम करण्याच्या ठरलेल्या पद्धती, मुंबई लोकलबरोबरचं अचूक नियोजन, प्रत्येकाची जबाबदारी, सोपी पण प्रभावी कोडींग सिस्टम आणि शेवटची आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे शिस्त आणि कामाप्रती जबाबदारी आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

एआय सुद्धा यांची जागा घेऊन शकत नाही… (Viral Video)

त्यांची काम करण्याची पद्धत आजच्या आधुनिक सप्लाय चेन (supply chain) सारखीच आहे, जसे की,
क्रॉस-डॉकिंग – डब्बे एका ठिकाणी साठवून न ठेवता लगेच पुढच्या ठिकाणी पाठवला जातो.
हब-अँड-स्पोक पद्धत – सगळे डब्बे आधी एका मुख्य केंद्रावर (hub) जमा हॉट आणि तिथून वेगवेगळ्या ठिकाणी (spokes) पाठवले जातात.
लास्ट-माईल डिलिव्हरी – डिलिव्हरीचा शेवटचा टप्पा. डब्बा ग्राहकाच्या हातात पोहचवला जातो.

पण हे सगळं मुंबईच्या डबेवाल्यांच्या खूप वर्षांपूर्वीपासून सुरू केलं आहे, जेव्हा हे शब्द जगात प्रसिद्ध सुद्धा नव्हते. त्यामुळे इन्स्टाग्राम युजरला एक गोष्ट कळली की, तंत्रज्ञान मदत करतं, पण यशासाठी मजबूत पद्धती आणि जबाबदार माणसं जास्त महत्त्वाची असतात. मूलभूत गोष्टी योग्य असतील, तर मोठं आणि कठीण कामही अगदी अचूक करता येतं.म्हणूनच कदाचित या डबेवाल्यांना मुंबईचे खरे हिरो म्हंटलं जातं.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @ifreightbox.scm या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून मुंबईच्या डबे वाल्यांचे कौतुक करत “स्विगी-झोमॅटो सुद्धा हे इतकं परफेक्ट करू शकत नाहीत”, “अगदी एआय सुद्धा यांची जागा घेऊन शकत नाही”, “त्यांच्या कामातील कार्यक्षमतेचं मुख्य कारण म्हणजे प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी नीट पार पाडणे आणि आपलं काम दुसऱ्यावर न ढकलणे. भारतामध्ये अनेक ठिकाणी हीच दोन मोठी समस्या दिसतात. लोक जबाबदारी टाळतात किंवा काम दुसऱ्यावर सोपवतात”, “सर्व परदेशी लोक त्यांना पाहायला येत आहेत आणि विचारत आहेत, “हे कसं शक्य आहे?” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत.