Check Sunset Time Without Watch : डोंगरात ट्रेकिंग करायला जाताना किंवा शांत समुद्रकिनाऱ्यावर बसलेले असताना आपण नेहमी सूर्यास्त कधी होणार याची वाट बघत असतो. सूर्योदय आणि सूर्यास्ता, अंधार पडायला अजून किती वेळ उरला आहे? याचे उत्तर शोधण्यासाठी आपण अनेकदा घडाळ्यात पाहतो किंवा गूगलवर सर्च करतो. पण, जर अशावेळी तुमचा फोन बंद असेल किंवा तुम्ही घनदाट जंगलात असाल तर काय करणार? तर यासाठी एक जबरदस्त उपाय आयएएफ पायलटने सुचवला आहे.

कोणत्याही गॅझेटशिवाय केवळ आपल्या बोटांचा वापर करून सूर्यास्ताची अचूक वेळ पाहण्याची एक अनोखी युक्ती दाखवतो. विशेष म्हणजे, ही युक्ती भारतीय हवाई दलाच्या एका पायलटने शिकवली आहे. @grittywheels नावाच्या एका प्रवासी आणि बाईकरने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये, एक माणूस एका टेकडीवर उभा राहून मावळत्या सूर्याकडे बोट दाखवत एक “लष्करी युक्ती” समजावून सांगताना दिसत आहे.

१. सूर्याकडे तोंड करून सरळ उभे राहा. तुमचा एक हात पूर्णपणे सरळ ठेवा. लक्षात ठेवा हात वाकलेला नसावा, कोपर सरळ ठेवावा.

२. आता हाताची बोटं एकत्र करून ती सूर्याच्या खाली ठेवा. सूर्याच्या खालच्या भाग आणि क्षितिज (जिथे जमीन / डोंगर आणि आकाश मिळाल्यासारखं दिसतं) यांच्यामधलं अंतर बोटांनी मोजा.

३. १ बोट = १५ मिनिटं
४ बोटं (एका हाताची रुंदी) = १ तास (६० मिनिटं)

सूर्य क्षितिजापासून किती वर आहे, हे बोटांनी मोजून आपण साधारण किती वेळ शिल्लक आहे हे काढू शकतो. याचा अर्थ, जर सूर्य आणि क्षितिज यांच्यामध्ये चार बोटांचे अंतर असेल, तर सूर्यास्ताला एक तास बाकी आहे. व्हायरल व्हिडीओतील हाताच्या स्थितीनुसार, सूर्य आणि टेकडी यांच्यामध्ये सुमारे दीड ते दोन बोटांचे अंतर आहे. याचा अर्थ सूर्यास्ताला सुमारे २० ते ३० मिनिटे शिल्लक होती.

व्हिडीओ नक्की बघा…

जे लोक नियमित कॅम्पिंग, हायकिंग किंवा बाईक राईडसाठी जातात त्यांच्यासाठी हा ‘सर्व्हायव्हल हॅक’ अत्यंत उपयुक्त आहे. जंगलात किंवा डोंगरांमध्ये योग्य वेळी तंबू उभारणे, सुरक्षित ठिकाणी पोहोचणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे ही सोपी युक्ती खूप मोठी मदत करू शकते. सोशल मीडियावर लोक या हॅकला ‘अप्रतिम’ म्हणत आहेत. अनेक युजर्सनी कमेंट केली आहे की, पुढच्या वेळी डोंगरात गेल्यावर ते ही युक्ती नक्कीच वापरून पाहतील. तुम्हाला या अद्भुत युक्तीबद्दल आधीपासूनच माहिती होती का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा!