husband sing a song for wife viral video : सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यात, पार्कमध्ये जोडप्याचा रोमान्स पहिला की, अक्षरशः लोक संस्कार काढतात. पण, आज एका वृद्ध जोडप्याचा जबरदस्त व्हिडीओ व्हायरल होतो आहे. काही मंडळी जोडप्याचा गोड क्षण पाहून आपल्याबाबतही असं काही घडावं अशी प्रार्थना करतायत. नक्की काय आहे या व्हिडीओत चला जाणून घेऊयात…
एक वृद्ध माणूस त्याच्या झोपलेल्या पत्नीला हळूवारपणे कौतुकाने उठवताना दिसतो आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला बेडरूममध्ये वृद्ध महिला बेडवर विश्रांती घेत असते. हलक्या ब्लँकेटखाली उशीवर डोके ठेवून बायको झोपलेली असताना बेडच्या बाजूला तिचा नवरा उभा असतो, ज्याने पांढरा टी-शर्ट आणि शॉर्ट्स घातलेली दिसते आहे. तिला थेट उठवण्याऐवजी, तो हळूवारपणे पुढे झुकतो आणि तिच्या खांद्यावर हळूवारपणे थाप देतो. तो हसत हसत तिची प्रशंसा करू लागतो.
एवढंच नाही तर अगदी मधुर आवाजात “क्या खूब लगती हो. बडी सुंदर दिखती हो. उठो” असे गाणं म्हणण्यास सुरुवात करतो. झोपेतून उठवण्याचा प्रयत्न करताना सौंदर्याचे कौतुक सुद्धा करतो. या साध्या क्षणाने सोशल मीडियावर अनेक लोकांच्या मनाला स्पर्श केला. अनेकांनी सांगितले की, या कृतीमुळे अनेक वर्षे एकत्र आयुष्य घालवणाऱ्या जोडप्यांचे नाते कसे असते, हे स्पष्ट दिसते.
म्हातारपणाचं खरं बक्षीस (Viral Video)
त्यामुळे ही एक गोष्ट सिद्ध होते की, अशा नात्यात प्रेम दाखवण्यासाठी मोठ्या-मोठ्या गोष्टींची गरज नसते; तर प्रेम हलक्या शब्दांत, एकमेकांची काळजी घेण्यात दिसून येते. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @theycallmeyash आणि @yashhviiii या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “जर ७० व्या वर्षी तुमचा जोडीदार तुम्हाला अशाप्रकारे उठवू शकत नसेल तर काय अर्थ आहे एकत्र राहण्याचा” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
नेटकरी व्हिडीओ पाहून “असे क्षण म्हातारपणाचे खरे बक्षीस आहेत”, “पार्किन्सनसारख्या आजारानेही त्याच्या आवाजातील प्रेम कमी करू शकलेनाही”,
“प्रेम वयानुसार कमी होत नाही, ते फक्त काळानुसार खोल आणि अधिक अर्थपूर्ण बनते”, “व्हिडीओ बघून मला अचानक माझे आजोबा-आजी आठवले”, “माझे आजोबा आजींना अगदी अशाच प्रेमाने उठवायचे. आजोबांचे नाव महादेव आणि आजीचे नाव लीला होते. म्हणून आम्ही प्रेमाने तिला “महादेवाची लीला” असे म्हणायचो” ; आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत.
