Viral video: सध्या अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. ज्यामुळे नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. बऱ्याच ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते, घरं पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये माणसांप्रमाणे प्राण्यांनाही वेगवेगळ्या संकटांना सामोरं जावं लागतंय. माणसं मदतीसाठी विचारू शकतात मात्र प्राण्यांचं तसं नसतं, ते दुसऱ्यावर अवलंबून असतात. एकूणच माणुसकीच्या नात्याने माणूस केवळ माणसांशी नव्हे तर प्राण्यांशीसुद्धा नकळत नातेसंबंध जोडत असतो. तर आज सोशल मीडियावर याचे एक उत्तम उदाहरण पाहायला मिळालं आहे. पुरात अडकलेल्या मांजरांची तरुणांना आली दया दोन मांजरी पुर आल्यामुळे एका घराच्या छतावर जाऊन बसल्या, मात्र किती दिवस उपाशी राहणार? हेच ओळखून काही लोकांनी माणुसकी दाखवली आहे. काही तरुणांना या मांजरीची दया आली आणि त्यांना त्यांनी काय केलं हे पाहाच. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पूर आल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. अक्षरश: घरंही पाण्याखाली गेलेली दिसत आहेत. तर लोकांच्या कंबरेच्या वर पाणी आलं आहे. अशावेळी तीन तरुण एका घराच्या बाजूला येतात आणि त्यातला एक जण संपूर्ण पाण्याखाली गेलेल्या घराच्या वर चढतो. सुरुवातीला हे नक्की काय चाललंय कळत नाही मात्र नंतर तुम्ही पाहू शकता, या व्यक्तीच्या हातात एक पिशवी आहे. या पिशवीमध्ये मांजरांसाठी काहीतरी खाऊ घेऊन हा व्यक्ती घराच्या वर चढला आहे. या व्यक्तीला बघून मांजरीही त्याच्या जवळ येतात आणि त्यानं दिलेलं खाऊ लागतात. पाहा व्हिडीओ हेही वाचा >> रायगडमध्ये माजी सैनिकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण; कारण ऐकून अवाक् व्हाल; थरारक VIDEO व्हायरल "माणसात माणुसकी अनंत राहू दे" सोशल मीडियावर हा व्हिडीओ ज़िन्दगी गुलज़ार है ! या पेजच्या @ivaibhavk या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘माणसात माणुसकी अनंत राहू दे ’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. कठीण परिस्थितीत केवळ मानवच नाही तर भटक्या प्राण्यांनासुद्धा भीती वाटते. मानवाप्रमाणे भटक्या प्राण्यांना सुद्धा मदतीची गरज असते. तसंच काहीस या व्हिडीओतही पाहायला मिळालं आहे. केलेली मदत पाहून युजर्स त्याचे खूप कौतुक करताना दिसत आहेत. त्यावर एकाने कमेंटमध्ये लिहिलेय, “खूप छान काम.. जगाला अशाच चांगल्या व्यक्तींची गरज आहे.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “मन जिंकलंस भावा!” आणखी एकाने कमेंट करून लिहिलेय, “धन्यवाद भावा! चांगलं काम केलंस तू.”