Viral Video: सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. सोशल मीडियामुळे मिळणाऱ्या प्रसिद्धीसाठी लोक दिवसेंदिवस नवनवीन प्रकारचे व्हिडीओ बनविताना दिसतात. ज्यात कधी कोण डान्स करतं, कधी कोण गाणं म्हणतं, तसेच काही जण यावर कॉमेडी करतानाही दिसतात. हे व्हिडीओ खूप चर्चेतही असतात. पण, त्याव्यतिरिक्त सोशल मीडियावर भांडण, मारहाण, अपघात यांचे व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. बऱ्याचदा त्यामध्ये घरगुती भांडणेदेखील खूप व्हायरल झालेली आपण पाहतो. असे व्हिडीओ बऱ्याचदा सोशल मीडियावर मनोरंजनाचा विषय ठरतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

पनी-पत्नीमध्ये जितके प्रेम असते तितकेच ते जास्त भांडतात, आपल्या जोडीदारासोबत भांडण, राग, रुसवा-फुगवा या गोष्टी नात्यात नेहमीच प्रेम वाढवतात. पण, बऱ्याचदा काही भांडणांमध्ये एकमेकांना मारहाणदेखील केली जाते. मात्र, अनेकदा अशा भांडणानंतरही दोघे पुन्हा एकत्र येतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय; जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक जोडपे त्यांच्या घराबाहेर एकमेकांसोबत भांडताना दिसत आहे. त्यावेळी अचानक पती त्याच्या पत्नीच्या डोक्यात मारण्यासाठी हातात वीट घेतो; पण काही वेळाने तो हातातील वीट खाली फेकून पत्नीची बॅग घेऊन तिला घराबाहेर हाकलण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी त्याची पत्नी फेकलेली वीट स्वतःच्या हातात घेते आणि त्याच्या डोक्यात मारण्यासाठी जाते. पत्नी डोक्यात वीट मारणार हे दिसताच पती खूप घाबरतो. इतक्यात ती वीट चुकून तिच्या हातातून खाली पडते. त्यावेळी पती तिला पकडतो आणि बेदम चोप देतो. यावेळी त्यांची मुलगी हा सर्व प्रकार घरातून पाहत, ती मोठमोठ्याने हसताना दिसत आहे. हा सर्व विचित्र प्रकार पाहता, हे सर्व नाटक व्हिडीओ बनविण्यासाठी केल्याचे दिसत आहे.

हेही वाचा: ‘बदो बदी’ गाण्यावर किली पॉलचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “या गाण्याची कमी…”

पाहा व्हिडीओ:

या व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @riya_rajpoot16 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्युज आणि एक लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्सही यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिले, “गेम चेंजर.” दुसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “ही बॅग कोणाची आहे?” आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “मी आणि माझी बायकोपण असंच भांडतो.” तर आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “त्यांची मुलगी हे भांडण एन्जॉय करतेय.”