Viral Video: सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून सोशल मीडियावर लग्नातील हटके रील्स, व्हिडीओ आणि फोटो सतत व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एका हळदीतील सुंदर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात एक पत्नी आपल्या पतीसमोर डान्स करत असून तिचा पती तिला पाहून लाजताना दिसतोय.
हल्ली सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण सोशल मीडियावर वेगवेगळी कला सादर करताना दिसतात, ज्यात डान्स करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक पाहायला मिळते. आताही असाच एक डान्सचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात पती-पत्नी नाचताना दिसतायत.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका हळदीच्या कार्यक्रमामध्ये पत्नी नाचत असून यावेळी तिचा पतीदेखील तिच्यासारखं नाचण्याचा प्रयत्न करत आहे, पण यावेळी तो पत्नीला पाहून लाजतो. त्यांचा हा सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @shubhjyot0825 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर आतापर्यंत चार मिलियनहून अधिक व्ह्युज आणि एक लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर अनेक जण कमेंट्सदेखील करताना दिसत आहेत.