Dance Video: आयुष्यात आपल्या मनासारखा योग्य जोडीदार मिळणं म्हणजे नशीबच समजायचं. आपल्या सुख-दुःखात नेहमी साथ देणारा जोडीदार असला की सगळ्या संकटांना सामोरं जायला बळ मिळतं. आपल्या आवडीच्या माणसाचा क्षणभर सहवास जरी लाभला तरी तो हवाहवासा वाटतो. या नात्यात फक्त प्रेम आणि प्रेमाची अपेक्षा असते आणि दोन्ही बाजूने प्रेम जर समान असेल तर आयुष्याचा प्रवास सुखकर होतो.

प्रत्येक नातं जपायला थोडी अधिकची मेहनत घ्यावीच लागते. लहान-सहान गोष्टीने आपल्या त्या नात्याला फुलवणे गरजेचे असते. एकमेकांच्या सुख दुखात सहभागी झालं की आपोआप सगळं सुरळीत होतं. अशातच जर जोडीदार अगदी आपल्यासारखाच हौशी असेल तर बात काही औरच…

सध्या नवरा बायकोचा एक धम्माल व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, या व्हिडीओमध्ये अगदी एनर्जेटिक डान्स करताना दोघंही दिसतायत. लहान-सहान गोष्टींमध्ये कसा आनंद साजरा करायचा हे त्यांना कळलंय. आणि तोच आनंद या व्हिडीओमध्ये दिसून येतोय.

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की नवरा बायको किती आनंदात एकमेकांना साथ देत डान्स करताना दिसत आहे. एका समारंभात हे दोघं अगदी बेभान होऊन नाचतायत. “मी तुझी काचो सुपारी तू माझा अडकित्ता” या गाण्यावर अगदी सारख्या स्टेप्स करत दोघांनी डान्स केला आहे. दोघांचा हा डान्स बघायला गर्दी जमल्यातं व्हिडीओमध्ये दिसून येतंय. याचसोबत अगदी एनर्जी आणि जोशात दोघांनी माहोलच तयार केला आहे. दोघांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. आणि अनेक युजर्सच्या प्रतिक्रियादेखील आल्या आहेत.

https://www.instagram.com/its_me_nil__09/reel/DXcCSr1jLQw

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @its_me_nil__09 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल २.४ मिलियन व्ह्युज आले आहेत. तर “मम्मीच्या डान्सने वेड लावलं” असं कॅप्शन व्हिडीओला देण्यात आलं आहे.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “फुल राडाच केला राव!”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “कसली एनर्जी आहे तुम्हा दोघांमध्ये”, तर तिसऱ्याने “एकदम कडक डान्स” अशी कमेंट केली. तर “दोघांनी पण आग लावून टाकली एकदम, जबरदस्त डान्स केला आहे” अशी एकाने कमेंट केली.