Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हायरल व्हिडीओ आपण दररोज पाहतो. ज्यातील बऱ्याच व्हिडीओंमुळे आपले मनोरंजन होते. पण, अनेकदा रील्सच्या नावाखाली अश्लील डान्सचे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे पाहून युजर्स प्रचंड संताप व्यक्त करताना दिसतात. लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणत्या थराला जातील हे सांगता येत नाही. पण, अनेकदा काही लोक त्यांच्या साधेपणामुळेदेखील लोकप्रिय होतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक कपल सुंदर डान्स करताना दिसत आहे.

नृत्य ही एक खूप सुंदर कला आहे; परंतु आजकाल काही लोक या कलेचा अपमान करताना दिसतात. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी काही जण मुद्दाम अश्लील पद्धतीचे नृत्य करतात. पण आता असा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यातील डान्स पाहून तुम्हीही त्यांचे कौतुक कराल.

हल्ली कपल डान्स सर्रास सर्व कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळतात. लग्न सोहळा असो किंवा इतर कुठलाही कार्यक्रम असो, लोक आपल्या जोडीदारासह आवर्जून ठेका धरतात. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक कपल हटके पद्धतीने डान्स करताना दिसत आहे, जे पाहून युजर्सही कौतुक करताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सर्वजण नाचत असून यावेळी एका पती-पत्नीच्या जोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी ते दोघेळी अतिशय साधा परंतु सुंदर डान्स करतात. यावेळी ते ‘नटीनं मारली मिठी’ या मराठी ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करतात. त्यांचा हा हटके डान्स सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. यावर अनेकजण कमेंट्सही करक आहेत.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by TJ (@official_photographer_3)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @official_photographer_3 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याला आतापर्यंत मिलिन्समध्ये व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलेय, “जोडी जाम भारी”. दुसऱ्याने लिहिलेय, “सुंदर डान्स”. आणखी एकाने लिहिलेय, “काय सुंदर नाचले राव”, तर आणखी एका युजरने लिहिलंय की, “दादा-ताई खूप सुंदर नाचलात”, तर आणखी एका व्यक्तीने लिहिलंय की, “कमालच केली राव तुम्ही तर”.

दरम्यान, यापूर्वी देखील अशा अनेक पती-पत्नीच्या जोडीचे विविध व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना तुम्ही पाहिले असतील. ज्यात काही सार्वजनिक ठिकाणी बेभान होऊन नाचताना दिसले तर काही कपल्स रोमाँटिक डान्स करताना दिसले.