प्रयागराजच्या महाकुंभ २०२५ मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या व्यक्तींमध्ये अभय सिंह यांच्या नावाचा समावेश होता. आयआयटी बॉम्बेचे माजी विद्यार्थी असलेले अभय सिंह महाकुंभमध्ये मोठा चर्चेचा विषय ठरले होते आणि आयआयटी बाबा म्हणून प्रसिद्ध झाले. एरोस्पेस अभियंता होण्यापासून ते आध्यात्म स्वीकारण्यापर्यंतच्या त्यांच्या प्रवासाने अनेकांना भुरळ घातली आणि अनेकांचे लक्ष वेधले. परंतु, त्यांच्या लोकप्रियतेने आता नाट्यमय वळण घेतले आहे. जुना आखाड्याने अभय सिंह यांना शिस्तीच्या कठोर संहितेचा भंग केल्याचा आणि त्यांचे गुरू महंत सोमेश्वर पुरी यांच्याबद्दल अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप करत हा गुरू-शिष्य परंपरेतील गंभीर गुन्हा असल्याचे सांगत आखाड्यातून बाहेर काढले आहे. अभय सिंहने मात्र कोणत्याही चुकीचे कृत्य केले नसल्याचे सांगितले आहे आणि त्याच्याबरोबर असणाऱ्यांनी त्याच्या विरोधात अफवा पसरवल्याचा आरोप केला आहे.
आयआयटी बाबा सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एका टीव्ही शो दरम्यान त्यांच्यावर हल्ला झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणखी एक क्लिप समोर आली आहे ज्यामध्ये ते ‘तांडव नृत्य’ करत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओवर ऑनलाइन संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
आयआयटी बाबा यांना एका मीडिया हाऊसने मुलाखतीसाठी आमंत्रित केले होते, परंतु काही लोकांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले आणि नंतर त्यांच्यावर हल्ला केला तेव्हा परिस्थितीला धक्कादायक वळण मिळाले. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झाली. हल्ल्यानंतर अभय सिंग यांनी नोएडा सेक्टर १६२ येथे पोलिस तक्रार दाखल केली.
हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरलल्यानंतर काही वेळातच, आणखी एका क्लिपमध्ये आयआयटी बाबा एका बंद खोलीत नाचताना दिसत होते. काळी धोतर आणि अनेक माळा घालून, ते कानात इअरफोन घालून ‘तांडव नृत्य’ करताना दिसत होते. ‘कल्कीवर्ल्ड७७७’ या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केलेला हा व्हिडिओ लवकरच व्हायरल झाला आहे.
व्हिडिओवरून लोकांमध्ये मतभेद आहेत. काहींनी त्यांचे समर्थन केले आहे, तर काहींनी त्यांच्या कृतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका वापरकर्त्याने केली केली, “ना सम्मान का मोह ना अपमान का भय (ना सन्मान मिळविण्याचा मोह, ना अपमानाची भिती), हर हर महादेव.” दुसऱ्याने लिहिले, “जे काही झाले ते चुकीचे होते; तांडव करणे आवश्यक आहे.”
तिसऱ्याने कमेंट केली, “याला उपचाराची गरज आहे”
चौथा म्हणाला , “काहीही म्हणा, हा माणूस मुक्त जीवन जगत आहे, त्रासलेलो तर आपण आहोत,ज्यांना प्रत्येक गोष्टीची चिंता असते”
वाद असूनही, आयआयटी बाबांची लोकप्रियता वाढत आहे, अधिकाधिक लोक अध्यात्माकडे त्यांच्या अद्वितीय दृष्टिकोनावर चर्चा करत आहेत.