जगात कुठे ना कुठे अपघात होतच असतात. काही अपघात गंभीर स्वरूपाचे असतात तर काही किरकोळ स्वरूपाचे. अनेक अपघातांचे व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ पाहून आपल्याला हसू येते तर काही व्हिडीओ पाहून आपल्याला धक्का बसतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुलावरून खाली घसरलेला ट्रक उचलताना एक टोइंग क्रेन पाण्यात कोसळल्याची धक्कादायक घटना ओडिशातील तालचेर शहरात घडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, एक ट्रक उचलण्यासाठी दोन क्रेन पुलावर काम करत होत्या. मात्र, वाहन काळजीपूर्वक पाण्यातून बाहेर काढले जात असतानाच एका क्रेनची केबल अचानक तुटली आणि संपूर्ण भार दुसऱ्या क्रेनवर गेला. यामुळे दुसरी क्रेन हळूहळू पुलाच्या बाजूला घसरली आणि शेवटी पाण्यात पडली. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

Optical Illusion: तुम्ही या चित्रात सर्वप्रथम काय पाहिले? उत्तरावरून जाणून घेता येणार तुमचं व्यक्तिमत्त्व

क्रेनमध्ये चालकही उपस्थित होता आणि तोही पुलावरून खाली पडला. सुदैवाने चालकाचा जीव वाचला. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पाण्यात पडलेला चालकही त्याच्या क्रेनच्या केबिनमधून सुखरूप बाहेर येण्यात यशस्वी झाला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे आणि हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

एका युजरने लिहिले की, ‘या दोन्ही क्रेन तो ट्रक उचलण्यासाठी सक्षम होत्या का? त्या व्यवस्थित बांधल्या होत्या का? की त्या क्रेन खूप हलक्या होत्या?’ दुसर्‍या वापरकर्त्याने विचारले, ‘क्रेन ऑपरेटरला बाहेर पडून किनार्‍यावर पोहता आले हे पाहून खूप आनंद झाला.’ एक तिसरा म्हणाला, ‘काय चुकले ते कळत नाही, ज्यामुळे ती क्रेनही नदीत पडली. कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही हे चांगले आहे.’ चौथा म्हणाला, ‘मला आशा आहे की ट्रक आणि क्रेन नदीतून काढण्याचे साधन त्यांच्याकडे असेल’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video in an attempt to save the truck crane also fell into river shocking accident caught on camera pvp
First published on: 05-08-2022 at 12:06 IST