रस्त्यावरुन भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीच्या पुढील चाकामध्ये एक वानर अडकल्याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियामवर व्हायरल होत आहे. वानर चाकामध्ये अडकल्याचा व्हिडीओ पाहताना तुमचे मन देखील विचलित होऊ शकतं.

अनेकवेळा वाहन चालवताना अचानक वाहनासमोर आलेल्या वेगवेगळ्या प्राण्यांमुळे अनेक अपघात होतात. या अपघातांमध्ये अनेकवेळेला गाडीचालकांसह त्या प्राण्यांना देखील आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे वाहन चालवताना योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना सतत वाहतूक प्रशासनाकडून करण्यात येत असतात.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
tank bomb shell Hinjewadi
हिंजवडीत पुलाचे काम करताना रणगाड्याचे बॉम्बशेल सापडले
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच

आणखी वाचा- दुर्दैवी : फेरफटका मारायला गच्चीवर गेला अन् माकडांनी केला हल्ला; जीव वाचविण्यासाठी घेतली उडी पण मृत्यूने गाठलं

मात्र, आपण कितीही काळजी घेतली तरीही काही अपघात हे टाळता येत नाहीत. अशाच एका भयानक अपघाताचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशमधील बाराबंकी बदोसराय येथे रस्ता पार करत असणारे एक वानर त्या रस्त्यावरुन जाणाऱ्या भरधाव दुचाकीखाली आल्याने ते गाडीच्या चाकात पुर्णपणे अडकले. गाडी चालकाने प्रसंगावधान राखत ब्रेक लावल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असली तरीही या अपघातामध्ये वानराचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं आहे.

दरम्यान, हा अपघात पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शिनी सांगितलं की, वानर रस्ता पार करण्याच्या तयारीत असतानाच एक भरधाव दुचाकी त्या रस्त्यावरुन आली आणि वानर दुचाकीच्या पुढील चाकामध्ये पुर्णपणे अडकले. उपस्थित लोकांच्या मदतीने चाकात अडकलेल्या वानराची सुटका करण्यात आली आणि चाकातून सुटका होताच वानराने तेथून पळ काढला. मात्र, गाडी चालकाने वेळेवर ब्रेक लावला नसता तर मोठा अनर्थ घडला असता असंही त्यांनी सांगितलं.

आणखी वाचा- १४ दिवस सलग सोशल मीडिया वापरणाऱ्याची अवस्था पाहून धक्का बसेल; पैसा कमवला पण…

वानराला वाचवताना मृत्यू –
याआधी देखील झाशीमध्ये गाडीसमोर आलेल्या वानराला वाचवण्याच्या नादात कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ती खड्यात पलटी झाली होती. या अपघातामध्ये चार जण जखमी तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.