Viral Video: समाजमाध्यमांवर सतत नव्या-जुन्या प्रसिद्ध गाण्यांवर अनेक जण डान्सचे रील्स बनवत असतात. अगदी लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येक वयोगटातील लोकांना आपण रील्स बनवताना पाहतो. सोशल मीडियाचे अधिक आकर्षण हल्लीच्या लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. ट्रेंडिंग गाणी, नवीन चित्रपट, त्यातील डायलॉग मुलांचे तोंडपाठ असतात. सोशल मीडियाप्रती मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे. आजपर्यंत डान्सचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल झालेले तुम्ही पाहिले असतील. आताही असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एक चिमुकली परदेशात भारतीय गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत आहे.
परदेशातील लोकांना भारतीय गाण्यांची भुरळ नेहमीच पडते. आजपर्यंत अशी अनेक प्रचलित झालेली गाणी तुम्ही पाहिली असतील, ज्यावर भारतीयच नव्हे जगभरातील अनेक लोक थिरकले; ज्यात आताचे ‘गुलाबी साडी’ गाणे असो किंवा काही वर्षांपूर्वीचे ‘झिंगाट’ गाणे असो, अशी अनेक गाणी परदेशातही खूप लोकप्रिय झाली आहेत. दरम्यान, आता एक चिमुकली मराठीमोळ्या ‘वाजले की बारा’ या गाण्यावर लावणी करताना दिसतेय. तिच्या या डान्सचे अनेक जण कौतुक करताना दिसत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक भारतीय चिमुकली परदेशातील रस्त्यावर ‘वाजले की बारा’ या गाण्यावर लावणी करताना दिसतेय. यावेळी तिने हिरव्या रंगाची साडी नेसली असून नाकात नथ, केसात गजराही माळलेला आहे. यावेळी ती खूप सुंदर डान्स करताना दिसतेय. तिचा हा डान्स पाहण्यासाठी अनेक जण जमा झाले असून तिचे फोटो आणि व्हिडीओही काढताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @kathashinde या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत दोन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून, दहा हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत.
पाहा व्हिडीओ:
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘खूपच सुंदर डान्स’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘मराठी मुलगी’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘एक नंबर डान्स’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘मोठी डान्सर होशील.’