air hostess viral video : तुम्ही यशस्वी झालात की, सगळ्यात पहिला आनंद हा आपल्या कुटुंबातील सदस्यांना होतो. कारण यशस्वी होण्यासाठी मुलांचे प्रयत्न पालकांनी बघितलेले असतात आणि पालकांनी त्या कठीण काळात केलेली मदत मुलांनी पाहिलेली असते. त्यामुळे यशस्वी होण्याच्या काळात घरच्यांचा पाठिंबा लाखमोलाचा असतो. त्यामुळे जेव्हा स्वप्न सत्यात उतरतात. तेव्हा सगळ्यात जास्त अभिमान त्यांनाच वाटतो. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून तुम्ही भारावून जाल…

‘इंडिगो’ मध्ये एअर होस्टेस (Air Hostess) म्हणून काम करणारी पूजाचे नेहमीच्या वेळेत विमान-लँडिंग होत असते. यादरम्यान तिचे कुटुंब टेरेसवर उभे राहून तिची वाट बघत असतात. विमान तिथून जात असतात जेव्हा ती खिडकीतून खाली बघते तेव्हा इमारतीच्या टेरेसवर तिचे कुटुंब विमानाच्या दिशेने हात हलवताना दिसले. हा क्षण तिने विमानाच्या खिडकीतून आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. कुटुंबाने केलेल्या सुंदर गोष्टीने लेक भारावून गेली आणि तिने हा व्हिडीओ शेअर केला.

तिला पाहण्यासाठी ते शक्य तितक्या उचांवर गेले (Viral Video)

व्हिडीओची सुरुवात एका विमानाच्या खिडकीतून घेतलेल्या दृश्याने झाली. विमानाच्या खिडकीतून शहर हळूहळू दिसू लागते. आधी फक्त छोटे छोटे घर, रस्ते, आणि मग टेरेस दिसू लागतात. मग व्हिडीओचा फोकस थोडा बदलतो. पूजा एका विशिष्ट घरावर लक्ष केंद्रित करते. जसे कॅमेरा झूम करत गेला, टेरेसवर काही छोटे लोक दिसू लागले. काही सेकंदांत त्यांच्या हालचाली स्पष्ट होऊ लागल्या आणि सगळे कुटुंबातील सदस्यच असून तिच्या विमानाकडे बघून तिला हाय म्हणताना दिसले.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @pooja.1428__ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “किती अद्भुत क्षण आहे! माझे कुटुंब मला पाहण्यासाठी टेरेसवर आले” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून एअर होस्टेसचे कौतुक करत “मीही माझ्या बहिणीला टेकऑफच्या वेळी पाहतो आणि तो अनुभव खूप स्वप्नासारखा वाटतो. तेव्हा तिचा खूप अभिमान वाटतो”, “ती उंच उडत असताना तिला पाहण्यासाठी ते शक्य तितक्या उंचावर चढले” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली केलेल्या आले आहेत.