Shocking video: लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडीया घेऊन येत असतात. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. दरम्यान एक चोरीची विचित्र घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर एक धक्कादायक तितच्या अजब घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे एका चोराने चोरीच करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्यासोबत असे काही घडलं आहे की तो पुन्हा चोरीचा विचारही करणार नाही. त्याला जन्मभराची अद्दल घडली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पाहा नेमकं काय घडंल या चोरासोबत? या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चोरांचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
या व्हिडीओमध्ये पाहू शकता, पठ्ठ्याला चोरीचा प्रयत्न चांगला अगंलट आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणाने रात्रीच्या वेळी क्लिनिकमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी त्याने रेलिंगच्या शटर तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी तो शटरमध्ये अडकून राहिल्याने त्याला स्वतची सुटका करुन घेण्यासाठी आसपासच्या लोकांना बोलवावे लादले. या चोराची मानच शटरमध्ये अडकली होती. यामुळे त्याला रात्रभर आसपास कोणीही नसल्याने तसेच अडकून राहावे लागले. सकाळी या घटनेकडे लोकांचे लक्ष गेल्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आले. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की घटनास्थळी तेथून जाणारे लोक चोराला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या देखील दाखल झाल्या होत्या. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर चोराला सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडीया घेऊन येत असतात. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही.
पाहा व्हिडीओ
हा सर्व प्रकार जवळच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल. हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
