Viral Video: आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियामुळे डान्सला एक नवी ओळख मिळाली आहे. पूर्वी नृत्य सादर करण्यासाठी मोठा मंच किंवा स्पर्धांची गरज भासत असे, पण आता मोबाईलच्या एका व्हिडीओद्वारे लाखो लोकांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर अनेक जण आपल्या नृत्यकौशल्याचे व्हिडीओ शेअर करतात. काही व्हिडीओ काही तासांतच व्हायरल होतात आणि सामान्य व्यक्तीलाही लोकप्रियता मिळते. सोशल मीडियावरील डान्स व्हिडीओ केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नसून ते फिटनेस, आत्मविश्वास आणि सर्जनशीलता वाढवण्याचे माध्यमही ठरत आहेत.
भारतीय गाण्यांची लोकप्रियता आता देशाच्या सीमा ओलांडून जगभर पोहोचली आहे. अनेक परदेशी कलाकार आणि कंटेंट क्रिएटर्स हिंदी, मराठी, पंजाबी तसेच दक्षिण भारतीय गाण्यांवर उत्साहाने डान्स करताना दिसतात. सोशल मीडियामुळे हे व्हिडीओ लाखो लोकांपर्यंत पोहोचतात आणि भारतीय संगीत व संस्कृतीचा जागतिक स्तरावर प्रचार होतो. आकर्षक बीट्स, दमदार हुक स्टेप्स आणि रंगतदार संगीतामुळे परदेशी कलाकारांनाही भारतीय गाण्यांवर नृत्य करण्याचा मोह आवरत नाही. अशा व्हिडीओंमुळे सांस्कृतिक देवाणघेवाण वाढते, विविध देशांतील लोक एकमेकांच्या कलेचा आदर करतात आणि भारतीय संगीताची लोकप्रियता आणखी उंचावते.
दरम्यान, आता एका परदेशातील कलाकाराचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात तो भारतीय गाण्यावर नाचताना दिसतोय. रिकी पाँड ज्यांना सोशल मीडियावर The Dabbling Dad म्हणूनही ओळखले जाते, हे अमेरिकेतील लोकप्रिय कंटेंट क्रिएटर आहेत. भारतीय गाणी, नृत्य आणि संस्कृतीबद्दल असलेल्या त्यांच्या प्रेमामुळे ते भारतातही मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाले आहेत.
या व्हिडीओमध्ये रिकी पाँड त्याच्या घरामध्ये ‘अस्सलाम-ए-इश्कुम यारा’ या गाण्यावर नाचताना दिसतोय. त्याच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून अनेक नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @ricky.pond या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या गाण्याला आतापर्यंत दोन मिलियन व्ह्यूज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर युजर्स अनेक कमेंट्स करतानाही दिसत आहेत. त्यावर एकाने लिहिलेय, “खूप भारी सर”, दुसऱ्या एकाने कमेंटमध्ये लिहिलेय, “मला अभिमान आहे मी भारतीय असल्याचा” आणखी एकाने लिहिलेय, “तुमचा डान्स पाहून भारी वाटलं” तर आणखी एकाने लिहिलेय, “मन जिंकलं सर तुम्ही.”
