Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच विविध प्रकारचे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. त्यातील काही व्हिडीओंमध्ये रील्स, गाणी, डान्स अशा प्रकारचे असंख्य विषय पाहायला मिळतात; पण यातील काही व्हिडीओ फक्त अधिकाधिक व्ह्युज, लाइक्स हव्यासापायी बनवले जातात. मात्र, हे व्हिडीओ बनविण्यासाठी काही जण कोणत्याही थराला जाऊ शकतात याचा प्रत्यय देणाऱ्या अनेक घटना आपण पाहिल्या किंवा ऐकल्याच असतील. अशा व्हिडीओंमुळे समाजातील इतर लोकही अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. सध्या एका व्यक्तीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय; जो पाहून युजर्स प्रचंड संताप व्यक्त करताना दिसत आहेत. वडील आणि मुलांचे नाते नेहमीच खूप खास असते, लहान मुलांना त्यांच्या बाबांबरोबर बाईकवरून किंवा कारमधून फिरायला खूप आवडते. पण, हल्ली अनेक जण मुलांना गाडीमध्ये बसवून त्यांच्याबरोबर रील्स बनवतात. सध्या अशा प्रकारचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय; जो पाहून अनेक युजर्स तीव्र संताप व्यक्त करताना दिसत आहेत. नक्की काय घडले व्हिडीओमध्ये? (Viral Video) या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती कार चालवत असून, त्यावेळी त्यानं त्याच्या मांडीवर लहान मुलीला बसवलं आहे. यावेळी ती चिमुकली झोपल्याचे दिसत आहे आणि नंतर पुढे ती तिच्या बाबांबरोबर मस्ती करीत असल्याचेही दिसत आहे. यावेळी कारचालकाचं लक्ष समोर नसून त्याच्या मुलीकडेच आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोक त्या व्यक्तीला ट्रोल करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये लिहिलेय की, बाबा आणि मुलीचे प्रेम पाहायला छान दिसतेय. परंतु, समोरून एखाद्या गाडीशी टक्कर आणि त्यानंतर एअरबॅग तैनात झाल्यास, बाळाची कवटी ३२० किमी/तास ६-८ इंच वेगाने माणसाच्या बरगड्यांमध्ये जाऊ शकते आणि दोघांचाही तत्काळ मृत्यू होऊ शकतो. भारतीय पालकांनी कठोर वास्तव तपासण्याची गरज आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @Ashwin Rajenesh MD या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओला आतापर्यंत सहा लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत. हेही वाचा: अरेच्चा! श्वानाने कॉपी केली चक्क बॉबी देओलची स्टाइल; Viral Video पाहून युजर्सही झाले अवाक् पाहा व्हिडीओ: युजर्सच्या कमेंट्स चर्चेत एका युजरने लिहिलेय, “हे खूप बेजबाबदार आहे.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “खराब निर्णय, जोखीम मूल्यांकन आणि धोक्याची जाणीव. रस्ता सुरक्षेबद्दलचे अज्ञान आणि वाहतूक नियमांची अंमलबजावणी नसणे या गोष्टींचा मूर्खपणाशी मेळ घातल्यावर असेच घडते.” आणखी एका युजरने लिहिलेय, "मी दुसऱ्या आणि तिसऱ्या निरीक्षणाशी पूर्णपणे सहमत आहे." आणखी एकाने लिहिलेय, "रस्त्यावरील इतर प्रत्येक वाहनचालकाचा बेजबाबदारपणा, हा रस्त्यावरील प्रत्येकासाठी धोकादायक असतो."