सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हे भावनिक असतात तर काही व्हिडीओ हसवणारे असतात. पण काही व्हिडीओ हे लोकांना इतके गोंधळात टाकतात की त्याचं उत्तर देणं थोडं अवघडच बनतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करतोय. हा व्हिडीओ पाहून सारेच जण हैराण झालेत. तुम्हाला वाटत असेल की, या व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे, हा प्रश्न सर्वांना पडलाय. हा नक्की ट्रक आहे की बाईक? हे पाहण्यासाठी लोक टक लावून या व्हिडीओला वारंवार पाहू लागले आहेत. पण आजपर्यंत कुणाला हे समजू शकलेलं नाही.

आजपर्यंत तुम्ही आजुबाजुला किंवा सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारची वाहनं पाहिली असतील. वेगवेगळ्या रचना असलेल्या गाड्या सोशल मीडियावर अनेकदा तुम्ही पाहिल्या असतील. पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमधली ही गाडी पाहिल्यानंतर लोकांच्या मनात एकच गोंधळ उडाला आहे. ही नक्की बाईक आहे की ट्रक, किंवा बाईक आणि ट्रकच्या संयुक्त रचनेतली कोणती नवा गाडी आहे, असा प्रश्न पडतो.

या व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक ट्रक रस्त्यावरून जात आहे. या ट्रकच्या पुढे एक व्यक्ती बाईक चालवताना दिसून येतोय. ट्रक आणि बाईक जोडून कोणती नवी गाडी तयार केली असेल असाच भास होताना दिसून येतो. हा व्हिडीओ आणखी निरखून पाहिला की भल्यामोठ्या ट्रकचा पुढचा भाग नसल्याचं लक्षात येतं. लोकांनी अशा रचनेच्या गाडीची कधी कल्पनाच केली नसेल. पण हा व्हिडीओ काळजीपूर्वक पाहिल्यानंतर या गाडीची रचना लक्षात येते. ट्रकचा मागचा भाग बाईकला जोडण्यात आला असून मग बाईकच्या मदतीने ट्रकचा मागचा भाग ओढत असल्याचं वाटू लागतं. पण ट्रकवर ठेवण्यात आलेल्या मालाचं इतकं मोठं वजन पाहून केवळ एका बाईकने भरमसाठ माल भरलेला ट्रक कसा काय ओढू शकतो असा देखील प्रश्न निर्माण होतो. तुम्ही सुद्धा हा व्हिडीओ एकदा नक्की पाहाच.

हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा गोंधळात पडलात ना? या वाहनाला ट्रक म्हणायचं की बाईक….? हे अजुनही लोकांना समजलेलं नाही. मात्र हा व्हिडीओ पाहून अनेकजण आश्चर्यचकित होऊन गोंधळात पडले आहेत.

fred035schultz नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. हा व्हिडीओ शेअर युजर्स एकमेकांना यातली गाडी ओळखण्याचं आव्हान देताना दिसून येत आहेत. आतापर्यंत ६३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून प्रत्येक जण आपआपला तर्क लावून या व्हिडीओवर वेगवेगळे कमेंट्स देताना दिसून येत आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही.