Viral Video: समाजमाध्यमांवर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. त्यामध्ये कधी कोणी डान्स, तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतात. त्यावर अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण व्हिडीओ रील्स बनवताना दिसतात. काही रील्स पाहून पोट धरून हसायला येतं, तर काही रील्स पाहून प्रेरणा मिळते. सध्या अशाच एका चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये ती चिमुकली शिक्षकांना राष्ट्रगीत लावण्याची विनंती करीत आहे.
शाळा म्हटलं की, आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू येतं. शाळेतले दिवस कधीही न विसरण्यासारखे असतात. शाळेत केलेला अभ्यास, मजा-मस्ती, भांडणं नेहमीच प्रत्येकाच्या आठवणींत घर करून राहतात. शाळेतल्या गोड गमती-जमती आणि मित्र-मैत्रिणी, शिक्षकांनी शिकवलेल्या कविता, गोष्टी, नेहमीच आपल्या स्मरणात असतात. आताच्या व्हिडीओमध्ये असाच एक गोड क्षण पाहायला मिळत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकली तिच्या शिक्षिकेकडे राष्ट्रगीत लावण्याचा हट्ट करीत आहे. यावेळी ती शिक्षिकेकडे जाऊन म्हणते, “बाई ‘जनगण’ लावायला सांगा…”, यावर शिक्षिका म्हणते, “लावायचं ना आता बेल होईल थोड्या वेळात तेव्हा लावू तुला आवडतं का ‘जनगण’ म्हणायला?”, यावर ती म्हणते, “हो मी सकाळीच म्हटलं होतं.” त्यानंतर ती तिच्या शिक्षिकेला ‘जनगण’ गाऊन दाखवते. सध्या या ग्रामीण शाळेतील चिमुकलीचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @savita_divekar_gadkar या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत एक दशलक्षाहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय, “एवढं तर आमच्या सरपंचाला बी येत नाही.” दुसऱ्या युजरनं लिहिलेय, “एवढं जनगणमन न चुकता आमच्या येथील ग्रामपंचायत सदस्यांनी म्हटलं, तर त्यांचा सत्कार करण्यात येईल.” तिसऱ्या व्यक्तीनं लिहिलंय, “मस्तच .” तर आणखी एकानं लिहिलंय, “खूप छान आराध्या. खूप गोड आहेस तू.”