Viral Video: सोशल मीडियावरील जंगलातील प्राण्यांचे अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. जंगलातील प्राण्यांबाबतीतल्या अनेक गोष्टी पाहण्यासाठी युजर्सही नेहमीच उत्सुक असतात. आतापर्यंत तुम्ही अनेक व्हिडीओंमध्ये वाघ, बिबट्या, सिंह किंवा चित्ता या हिंस्र प्राण्यांना नेहमीच इतर प्राण्यांची शिकार करताना पाहिले असेल. प्राण्यांची शिकार करण्यासाठी या हिंस्र प्राण्यांना अनेक प्रयत्न करावे लागतात. अगदी आपली शिकार शोधण्यापासून ते ती शिकार मिळवण्यापर्यंत हे हिंस्र प्राणी खूप मेहनत घेतात. आता एका बिबट्याचा असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय ज्यात हरणाची शिकार करण्यासाठी जीवतोडून धावताना दिसतोय.
हिंस्र प्राण्यांसाठी ज्याप्रमाणे आपली भूक भागवणं गरजेचं असतं, त्याचप्रमाणे ज्या प्राण्याचा जीव धोक्यात असतो, त्यालाही आपला जीव वाचावा, असं वाटतं. त्यामुळे तोदेखील जीवाच्या आकांतानं शिकार होण्यापासून वाचण्यासाठी पळत असतो. अनेकदा त्यांची ही धाव यशस्वी होते, तर अनेकदा त्यांना आपला जीव गमवावा लागतो. दरम्यान, आता असाच एक थरारक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, जंगलामध्ये शिकारीच्या शोधात असलेल्या बिबट्याची नजर हरणावर जाते. त्यामुळे हरणाची शिकार करण्यासाठी बिबट्या जीव तोडून धावतो आणि अखेर हरणावर झडप घालतो. यावेळी बिबट्या हरणाची मान आपल्या जबड्यात पकडतो. बिचारे हरिण कळवळून आपले प्राण सोडतो.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ यूट्यूबवरील @Animalsvideo-s8b या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला हजारो व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक जण कमेंट करताना दिसत आहेत. शिवाय यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय की, “बापरे खूपच भयानक”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “आज बिबट्याचं पोट भरलं”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “थरारक व्हिडीओ”, तर आणखी एका व्यक्तीने लिहिलंय की, “खूपच वाईट घटना.”
दरम्यान, यापूर्वीदेखील अशा प्रकारचे अनेक थरकाप उडवणारे व्हिडीओ व्हायरल झाले होते; ज्यात कधी वाघाने, तर कधी चित्त्याने प्राण्यांची शिकार केली होती.
