साधारणत: लोकांचं राहणीमान, चेहरा पाहून त्याची ‘औकात’ ठरवली जाते. मात्र ते अत्यंत चुकीचं आहे. माणसाला माणूस म्हणून पाहिलं पाहिजे. रंग-रुप, कपडे, राहणीमान पाहून त्याच्याशी कसं वागायचं हे ठरवणं अयोग्य आहे. कारण अनेकवेळा आपलं तसं वागणं हे आपलं अज्ञान दाखवणारं ठरू शकतं. सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकी एक व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. एक पाणीपुरीवाला सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आलाय. तुम्हाला विश्वास नाही होणार, पण हा पाणीपुरीवाला पदवीधर सुद्धा आहे.

हा विक्रेता रस्त्यावर पाणीपुरी विकतो. पाणीपुरी विकणाऱ्या या विक्रेत्याच्या भाषेवरुन सर्वजण अवाक् होऊन पाहात आहेत. हा विक्रेता ज्या पद्धतीने इंग्रजी बोलतोय, ते चकीत करणारं आहे. रस्त्यावर ये जा करणारे लोक क्षणभर थांबतात आणि या फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या पाणीपुरीवाल्याकडे बघतात. हा व्हायरल पाणीपुरीवाला सध्या सोशल मीडियावरील नेटकऱ्यांचा कुतुहलाचा विषय ठरतोय. या व्हिडीओमध्ये त्याच्या तोंडून फाडफाड इंग्रजी ऐकून भल्याभल्यांनी तोंडात बोटे घातली आहेत.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पाणीपुरीवाल्याचं नाव राहूल असं आहे. तो कानपुरमध्ये राहणारा आहे. या पाणीपुरीवाल्याचं कानपुरमध्ये एक मुरली पान भंड़ारचं स्टोअर सुद्धा आहे. राहूलचे वडील त्यांच्या पाणीपुरीसाठी खूप प्रसिद्ध होते. ते स्वतः घरगुती मसाले वापरत पाणीपुरी बनवत असत. वडिलांनी सुरू केलेला हा व्यवसाय राहूलने पुढे सुरूच ठेवला आणि आज तो य़शस्वीपणे चॅट कॉर्नर चालवतोय.

आणखी वाचा : हा गडी कोलांट्या उड्या मारत गोण्या उचलतो…कामातही आनंद शोधला पाहिजे! VIRAL VIDEO एकदा पाहाच…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : Lucky Boy! VIRAL VIDEO ने मालामल झाला हा ‘Paragliding Man’…; आज लाखोंमध्ये कमवतोय!

youtubeswadofficial नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. पाणीपुरीवाल्यांची ही फाडफाड इंग्रजी ऐकून सारेज जण त्याच्या टॅलेंटचं कौतुक करत आहेत. भल्याभल्या पदवीधारकांना सुद्धा मागे टाकेल इतकं स्पष्ट भाषेत हा पाणीपुरीवाला इंग्रजी बोलतोय. कोणताही व्यवसाय मोठा किंवा छोटा नसतो, असं देखील काही जण या व्हिडीओवर कमेंट करत आहेत. आणखी तर युजर्सनी या विक्रेत्याच्या स्टॉलवर दिसत असलेल्या स्वच्छतेचं कौतुक केलंय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : आधी पोटोबा आणि मग…, भूकेने व्याकूळ ड्रायव्हरने कार्डमधील माहिती लीक होण्याची जोखीम पत्कारली

एका युजरने कमेंट करत म्हटलं की, “मला रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा आदर आहे जे हायजेनिक हातमोजे घालतात आणि स्वच्छता ठेवतात,” तर दुसऱ्या एका युजरने कमेंट केलीय की, “कोणतं काम छोटं नसतं आणि कामापेक्षा कोणती गोष्टी मोठी नसते.”