Kids Dancing On Fathers Wedding Video : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ लोकांना हसवतात, तर काही थेट मनाला भिडतात. सध्या असाच एक गोड व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन लहान मुले आपल्या वडिलांच्या लग्नाच्या वरातीचा (Wedding Video) व्हिडिओ टीव्हीवर पाहून पूर्ण उत्साहात डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्या या डान्सने आता सर्वांचीच मनं जिंकली आहे,

वडिलांच्या लग्नाचा VIDEO लागताच मुलांचा डान्स सुरू

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, घराच्या लिव्हिंग रूममध्ये टीव्ही सुरू आहे. टीव्हीवर या मुलांच्या आईृ वडिलांच्या लग्नातील वरातीचा व्हिडिओ सुरु आहे. ढोल-ताशे, बँड बाजा आणि वऱ्हाडी मंडळींचा डान्स पाहून या दोन लहान मुलांनाही डान्स करण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी लगेच टीव्हीसमोर येऊन नाचायला सुरुवात केली. यावेळी ते असे काही नाचले की सर्वांचीच मनं जिंकली.

व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा आणि त्याची मोठी बहीण पूर्ण जोशात आणि उत्साहात डान्स करताना दिसत आहेत. मुलगी अतिशय सुंदर स्टेप्स करत आहे, तर तिचा लहान भाऊ तिची नक्कल करत आनंदाने नाचत आहे. इतकेच नाही तर, त्या लहान मुलीने चक्क स्टीलचा ग्लास हातात घेऊन नाचत जबरदस्त एक्सप्रेशन दिल्यात, ज्यामुळे हा व्हिडिओ आणखीनच मजेशीर झाला आहे.

दोन्ही मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यांना पाहून असे वाटते की, ते स्वतः आपल्या वडिलांच्या वरातीत प्रत्यक्ष सामील झाले आहेत. घरातील वातावरणही खूप आनंदी दिसत असून, कुटुंबातील काही सदस्य मागे उभे राहून मुलांच्या या गोड मस्तीचा आनंद घेताना दिसत आहेत.

नेटीझन्सनी व्हिडिओवर केला प्रेमाचा वर्षाव

हा व्हायरल व्हिडिओ एक्सवर @Lotus_indrajit नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मुले आपल्या वडिलांच्या वरातीचा व्हिडिओ लावून डान्स करत आहेत.’ या पोस्टला हजारो लाईक्स, शेकडो रीपोस्ट आणि लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये लोक मुलांच्या डान्सचे कौतुक करत आहेत. अनेक युजर्सनी लिहिले की, “बालपणाची हीच सर्वात सुंदर गोष्ट असते”, तर काहींनी म्हटले की, “या व्हिडिओने आमचा पूर्ण दिवस आनंददायी केला.”