Viral Video: सोशल मीडियावर कधी कुठलं गाणं व्हायरल होईल हे सांगता येत नाही. जेव्हापासून रील्स बनविण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे तेव्हापासून सतत विविध भाषांतील, विविध देशांतील नवनवीन गाणी व्हायरल होतात; ज्यावर लाखो लोक रील बनवतात. इतकेच नाही तर ही गाणी अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही लावली जातात. समाजमाध्यमांवर भारतीय गाण्यांवर अनेक परदेशातील कलाकार आणि इन्फ्लुएन्सरदेखील ठेका धरताना दिसतात.

भारतामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात. या भाषांमधील गाणीही सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. अल्बम साँग असो किंवा चित्रपटातील गाणी असो, ही एकदा चर्चेत आली की सोशल मीडियावरही अनेक जण त्या गाण्यांवर ठेका धरल्याशिवाय राहत नाहीत. मग ते गाणे भारतातील असो किंवा इतर कोणत्याही देशातील; त्या गाण्यावर अनेक लोक रील्स बनवितानाही दिसतात. आतापर्यंत सोशल मीडियावर अशा लाखो लोकप्रिय गाण्यांचे रील्स तयार केल्या गेल्याचे आपण पाहिले असेल. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात सुप्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉल एका भारतीय गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

भारतातील विविध भाषांतील गाणी सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. या गाण्यावर अनेक जण रील्सदेखील बनवतात. नेहमीच भारतीय गाण्यांवर रील्स बनविणारा सुप्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलने आता एका ‘दिल्ली से मनाली’ या चर्चेत असलेल्या गाण्यावरील डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचा हा डान्स पाहून नेटकरी त्याचं कौतुक करताना दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नेहमीप्रमाणे किली पॉल त्याच्या पारंपरिक वेशात असून तो‘दिल्ली से मनाली’ गाण्यावर डान्स करीत आहेत. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव लक्षवेधी असून त्याच्या डान्सची स्टेपदेखील लक्ष वेधून घेत आहे. त्याचा या व्हिडीओवरील डान्स पाहून युजर्सही कमेंट्स करताना दिसत आहेत.

इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलचे इन्टाग्रामवर दहा दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तसेच या व्हिडीओवर आतापर्यंत चौदा मिलियनहून अधिक व्ह्युज आणि चार लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Kili Paul (@kili_paul)

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “खूपच सुंदर भाऊ”, तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “तुझा डान्स नेहमीच भारी असतो”, तर आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “खूपच सुंदर डान्स किली” तर आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “किली पॉल तू खरंच भारी आहेस”, तसेच अनेक युजर्स किली पॉलचे कौतुक करताना दिसत आहेत.