Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांचे विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात अनेकदा प्राण्यांच्या गमती-जमती पाहायला मिळतात; तर कधी प्राण्यांचे थरारक व्हिडीओ पाहायला मिळतात. हे व्हिडीओ क्षणात लाखो व्ह्युज मिळवतात. सध्या असाच एक जंगलातील व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात सिंहांचा कळप बिबट्याची शिकार करताना दिसत आहे. हा थरकाप उडविणारा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

आजपर्यंत आपण अनेकदा जंगलातील वाघ, सिंह, बिबट्या यांसारख्या हिंस्र प्राण्यांना इतर प्राण्यांना शिकार करताना पाहिले आहे. पण, आज व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये काही सिंहांचा कळप चक्क बिबट्याची शिकार करीत आहे. हा थरकाप उडविणारा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जंगलामध्ये सिंहांचा एक कळप बिबट्याला पकडून त्याची शिकार करताना दिसत आहे. यावेळी सर्व जण मिळून त्याला पकडतात आणि त्याचे लचके तोडतात. हा थरारक व्हिडीओ पाहून अनेकांना घाम फुटला आहे.

हा व्हिडीओ यूट्यूबवरील @MalaMala Game Reserve या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत १४ दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि जवळपास ७४ हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. त्याशिवाय या व्हिडीओवर अनेक नेटकरी कमेंट्सही करताना दिसत आहेत.

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

या व्हायरल व्हिडीओवर एकाने लिहिलेय, “१२ सिंहांनी वेढलेला बिबट्या नक्कीच घाबरला असावा. त्याला माहीत होते की, हा त्याच्यासाठी शेवट आहे; पण तरीही तो त्याच्या भूमिकेवर उभा राहिला. शूर आत्मा.” तर दुसऱ्याने लिहिलेय, “यांच्या आकाराची तुलना खूप होऊ शकत नाही.” तिसऱ्याने लिहिलेय, “पुढच्या वेळी १२ बिबट्यांचा कळप एका सिंहावर हल्ला करील.” तर आणखी एकाने लिहिलेय, “बिबट्या मरेपर्यंत लढत होता. शरणागती नाही; खरा योद्धा.”

हेही वाचा: ‘आज की रात…’ गाण्यावर किली पॉलचा जबरदस्त स्लो मोशन डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

दरम्यान, यापूर्वीदेखील अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एका व्हिडीओत वाघाने तळ्यात पाणी पिणाऱ्या हरणाची शिकार केली होती; तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये सिंहाचे काही शावक म्हशीची शिकार करताना दिसले होते.