VIRAL VIDEO : साप भिंतीवर असा सरसर चढला की पाहून लोक म्हणाले, "परफेक्ट स्नेक गेम" | viral video kingsnake climbing brick wall imitates nokias iconic snake game video prp 93 | Loksatta

VIRAL VIDEO : साप भिंतीवर असा सरसर चढला की पाहून लोक म्हणाले, “परफेक्ट स्नेक गेम”

स्नेक गेमची आठवण करून देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे.

VIRAL VIDEO : साप भिंतीवर असा सरसर चढला की पाहून लोक म्हणाले, “परफेक्ट स्नेक गेम”
(Photo: Facebook/ Coronado National Memorial)

फार वर्षापूर्वी मोबाईलमध्ये तुम्ही स्नेक गेम कधी ना कधी खेळला असालच…आता हा गेम फक्त आठवणीतच राहिला आहे. या स्नेक गेमची आठवण करून देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक स्नेक गेमच्या वेगवेगळ्या आठवणी शेअर करू लागले आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये सोनोरन माउंटन किंग स्नेक अशा प्रकारे भिंतीवर चढताना दिसत आहे की तुम्हालाही २००० च्या दशकातील लोकप्रिय ‘स्नेक गेम’ आठवेल.

तुम्ही सापांना जमिनीवर सरपटताना किंवा वेटोळे घालून झाडांवर चढताना पाहिलं असेल, पण तुम्ही कोणताही साप सरळ भिंतीवर चढताना पाहिला आहे का? तेही सरड्यासारखं ? तुम्ही पाहिलं नसेल तर आत्ताच बघा. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, एक किंग स्नेक विटांच्या भिंतीवर अशा प्रकारे चढतो की नोकिया फोनमध्ये सापडलेला ‘स्नेक गेम’ तुम्हाला आठवेल. किंग स्नेकचा हा व्हिडीओ ज्याने कोणी पाहिला तो अवाक झाला आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : मुलगा की मुलगी? हे जाहीर करण्यासाठी अख्खा धबधबाच निळ्या रंगाचा केला

भिंतीवर चढलेल्या सापाचा हा व्हिडीओ कोरोनाडो नॅशनल मेमोरियलने फेसबुकवर शेअर केला आहे. यासोबत लिहिले आहे की, हा सोनोरन माउंटन किंगस्नेक आहे, जो पूर्वी स्मारकाच्या भिंतीवर चढताना सापडला होता. १ ऑक्टोबर रोजी शेअर केलेला हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओला आतापर्यंत २.८ लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत, तर हजाराहून अधिक लोकांनी याला लाईक केले आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर थक्क झालेले लोक त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, यामुळे मला नोकियाच्या स्नेक गेमची आठवण झाली. तर, दुसर्‍या यूजरने लिहिले आहे की, हा साप देखील खूपच अप्रतिम दिसत आहे.

आणखी वाचा : VIRAL : सरकारी शाळेची दुरवस्था पाहून ग्रामसभेत मुख्याध्यापकांचा रोष

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : इथे मरणावर आहे बंदी, ७५ वर्षापासून अंत्यसंस्कार झाले नाहीत तर रुग्णालयात लेबर वॉर्ड नाहीत

सोनोरन माउंटन किंगस्नेक हे मध्यम आकाराचे साप आहेत ज्यांच्या शरीरावर लाल, काळा आणि पांढरा क्रॉसबँड असतो. किंगस्नेक वेबसाइटनुसार, सोनोरन माउंटन किंग्स साप ऍरिझोनाच्या मध्य आणि आग्नेय पर्वतीय प्रदेशात आढळतात.

सध्या सोशल मीडियावर सापाचा असा एक व्हिडrओ व्हायरल होत आहे, ज्याने लोकांना ‘स्नेक गेम’ची आठवण करून दिली आहे. होय, तोच गेम जो तुम्ही मोबाईलमध्ये कधी ना कधी खेळलाच असेल. या गेममध्ये, साप भयानक पद्धतीने वाढतो आणि पुढे सरकतो, ज्याला तुम्ही मोबाईल स्क्रीनच्या भिंतींवर आदळण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Video: तुम्ही कधी हवेत तरंगणारे विमान पाहिलंय का? बुचकळ्यात टाकणारा हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच

संबंधित बातम्या

जुळ्या बहिणींशी लग्न करणारा तरुण अडचणीत? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा पोलिसांना निर्देश देत म्हणाल्या, “सोलापूरमधील एका…”
Video: सरन्यायाधीश चंद्रचूड लपूनछपून करायचे ‘रेडियो जॉकी’ची नोकरी; म्हणाले, “मी ‘प्ले इट कूल’, ‘डेट वीथ यू’ तसेच…”
पोटच्या लेकीशी लग्न, १५ वर्षीय मुलींशी सामूहिक शरीरसंबंध अन्.. देवाच्या नावावर केलेलं लज्जास्पद कृत्य उघड
Video: लोकलच्या गर्दीत ‘ती’ बाई हट्ट धरून बसली; रेल्वेचालक खाली उतरला अन म्हणाला, “आधी चल.. “
Video: भयंकर! चालत्या बसमध्ये चालकाला आला हार्ट अटॅक; नियंत्रण सुटल्याने बस प्रत्येकाला उडवत सुटली अन…

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘बेल बॉटम’ चित्रपटावर पाकिस्तानी चाहत्याचा आक्षेप; खुद्द अक्षय कुमारने दिलं स्पष्ट उत्तर
Video: दिल्लीतील भररस्त्यात ‘पानी दा रंग’ गाणे गात होता तरुण; अचानक आयुष्मान खुराना त्याच्या समोर आला अन्…
“Mother Of The Year”: रॅकून प्राण्याचा मुलीवर हल्ला, लेकीला वाचवण्यासाठी आईने असं काही केलं…; 15 million व्यूज मिळालेला Viral Video पाहतच राहाल
“मी त्याची…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारासाठी श्रेया बुगडेची खास पोस्ट
टूथब्रश किती दिवसानंतर बदलावा? टूथब्रश ठेवण्याच्या जागेचाही होतो आरोग्यावर परिणाम? जाणून घ्या