Metro station dance video: आजच्या धावपळीच्या आयुष्यात काम म्हणजे फक्त जबाबदारी असते असं नाही, तर त्यात थोडा आनंद, उत्साह आणि मोकळेपणा असायलाच हवा, हे कोची मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी दाखवून दिलं आहे. सध्या सोशल मीडियावर कोची मेट्रोतील कर्मचाऱ्यांचा एक डान्स व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून, नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहे. मेट्रोसारख्या शिस्तबद्ध आणि गंभीर ठिकाणीही कर्मचारी किती उत्साहाने, आनंदाने काम करतात याचं हे उत्तम उदाहरण ठरत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ कोची मेट्रो रेल लिमिटेडच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये मेट्रो कर्मचारी आपली ड्युटी सांभाळत असतानाच ट्रेंडिंग गाण्यांवर भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार मेट्रो स्टेशनवरच घडतो, पण कुठेही कामात अडथळा न आणता, अगदी मजेशीर पद्धतीने यांनी डान्स केला.

पहिल्या व्हिडीओमध्ये कोची मेट्रोची गणवेशातील एक तरुण कर्मचारी थांबलेल्या मेट्रो ट्रेनसमोर उभी राहून तमिळ चित्रपट दसरा मधील लोकप्रिय गाणं ‘मैनारू वेट्टी कट्टी’वर उत्स्फूर्तपणे डान्स करत आहे. तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि एनर्जी पाहून क्षणात लक्ष वेधलं जातं. काही क्षणातच एक तरुण कर्मचारी तिच्या डान्समध्ये सामील होतो आणि दोघं मिळून जबरदस्त डान्स करतात. विशेष म्हणजे स्टेशन जवळजवळ रिकामं असल्यामुळे हा डान्स आणखीनच लक्षवेधी वाटतो.

पाहा व्हिडीओ

या व्हिडीओला इन्स्टाग्रामवर आतापर्यंत ३० हजारांहून अधिक व्ह्युज मिळाले असून लाईक्स आणि शेअर्सचा पाऊस पडतो आहे. प्रतिक्रियांमध्ये नेटकऱ्यांनी भरभरून कौतुक केलं आहे. एका युजरने लिहिलं, “ट्रेंड कधीच मिस करू नका” दुसऱ्याने फक्त “Wow” अशी प्रतिक्रिया दिली, तर आणखी एका युजरने “खूपच ग्रेसफुल डान्स” असं म्हटलं आहे.

काही जणांनी वेगवेगळ्या इमोजींचा वापर करत कर्मचाऱ्यांची एनर्जी आणि पॉझिटिव्हीटीचं कौतुक केलं आहे. कोची मेट्रोचा हा व्हिडीओ केवळ मनोरंजन करत नाही, तर कामातही आनंद कसा शोधायचा हे शिकवतो. हा व्हिडीओ केवळ मनोरंजन करत नाही, तर कोणतंही काम आनंदाने आणि उत्साहाने केल्यास ते किती सुंदर वाटू शकतं, हेही दाखवून देतो.