video groom marathi ukhana viral : लग्नाचं घर म्हटलं की, प्रत्येक छोट्या छोट्या कार्यक्रमात उखाणा घ्यायला सांगितला जातो खास करून नव्या जोडप्याला. अशावेळी मजेशीर उखाणा घेतला तर मग तुमची त्या लग्नात किती चर्चा आणि प्रशंसा होणार हे काही नव्याने सांगायला नको. अनेकदा सून पहिल्यांदा सासरी जाणार म्हंटल्यावर तिचा उखाणा अगदी आवडीने ऐकला जातो. पण, सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; ज्यामध्ये नवरदेवाने घेतलेल्या उखाण्याने सगळ्यांचे लक्ष अगदी वेधून घेतले आहे.
व्हायरल व्हिडीओनुसार नवरदेव कोकणातला आहे. लग्न समारंभ पार पडला असून वरात घेऊन नवरा-नवरी घराजवळ पोहचले आहेत. याचदरम्यान मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांनी मिळून “नाव घे पोरा तू लाजू नकोस” मजेशी गाण्याद्वारे नवरदेवाला उखाणा घेण्याची विनंती करताना दिसत आहेत. विनंतीचा मान ठेवून नवरदेव सुद्धा “कोरलं नाव तुझं काळजावरी, कोरलं नाव तुझं काळजावरी, मी चाकरमानी आणि अपूर्वा माझी कोकणपरी” ; असा भन्नाट उखाणा नवरदेवाने घेतलेला दिसतो आहे.
“वा रे आमचा चाकरमानी” (Viral Video)
‘चाकरमानी’ हा शब्द कोकणातून मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये नोकरी, व्यवसाय किंवा उदरनिर्वाहासाठी गेलेल्या लोकांसाठी प्रेमाने वापरला जातो. वर्षभर शहरातील धावपळीत अडकलेले हे चाकरमानी उन्हाळी सुट्टी, होळी आणि विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात आवर्जून आपल्या गावाकडे, कोकणात परततात. या प्रवासात त्यांची सर्वात जिवाभावाची सोबती ठरते ती म्हणजे लाल परी, अर्थात एसटी बस. अनेक चाकरमान्यांच्या आठवणी, भावना आणि गावाशी जोडलेलं नातं या लालपरीशी घट्ट जोडलेलं आहे. त्यामुळेच ‘चाकरमानी’ आणि ‘लालपरी’ किंवा ‘कोकणपरी’ हे एकमेकांशिवाय अपूर्ण असल्याचं मानलं जातं.
व्हिडीओ नक्की बघा…
त्यामुळे नवरा-बायकोच्या नात्याला सुद्धा हीच उपमा देऊन नवरदेवाने हा खास उखाणा तयार केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @parab_apuu0699_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला होता. नेटकरी व्हिडीओ पाहून “जबरदस्त आम्ही कोकणकर”, “वा रे आमचा चाकरमानी”, “लय भारी राव”, “एकदम कडक भावा”, “एक नंबर”, “क्या बात हैं” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत…
