Viral Video: समाज माध्यमांवर कधी डान्स, तर कधी गाणी, कधी अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. त्यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की, ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. हल्ली सतत बॉलीवूडमधील नवी-जुनी गाणी पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. या गाण्यांवर लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण जमेल तसा डान्स करतो. त्यातील काही व्हिडीओ खूप चर्चेतही येतात. सध्या एका तरूणीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात एक तरुणी खूप सुंदर डान्स करताना दिसतेय.

लावणी नृत्य ही महाराष्ट्राची लोककला आहे. लावणी करण्यासाठी नृत्याची जाण तर लागतेच; पण त्या लावणीमध्ये एक ठसकेबाजपणा, नजाकत असावी लागते. हल्ली सोशल मीडियामुळे एकापेक्षा एक लावणी सादर करणाऱ्या कलाकारांचे अनेक व्हिडीओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण, त्यातील काही मोजक्याच व्हिडीओतील सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत येतात. आताही असाच एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नृत्य (डान्स ) ही कला आहे. ही कला जोपासावी लागते. प्रत्येक व्यक्ती तिला जमेल तसे डान्स करू शकते पण ज्यांना उत्तम डान्सर व्हायचे आहे असे लोक सातत्याने प्रयत्न करत राहतात आणि आपले सर्वोत्तम परफॉर्मन्स देतात. सध्या अशाच एका तरुणीचा व्हिडिओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी तिचे चाहते झाले आहेत.

सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात कधी समारंभाचे व्हिडीओ, लग्नाचे व्हिडीओ तर कधी नृत्याचे व्हिडीओ पाहायला मिळतात. परंतु, त्यातील काही मोजकेच व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत येतात. आता असाच एक व्हिडीओ खूप चर्चेत आलाय. ज्यात एक तरुणी खूप सुंदर लावणी करताना दिसतेय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी नऊवारी नेसून एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये “आम्ही नाय जा”, या गाण्यावर सुंदर लावणी सादर करतेय. तिच्या भन्नाट लावणी स्टेप्स आणि चेहऱ्यावरील अदाकारी पाहून नेटकरीही तिचं कौतुक करत आहेत. सध्या तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Minakshi Ramugade (@black_queen__minu__3131)

हा व्हिडीओ @black_queen_minu_3131 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्या व्हिडीओला आतापर्यंत मिलियन्समध्ये व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय, “अशी असते अस्सल लावणी” एका युजरने लिहिलेय, “खतरनाक लावणी” आणखी एका युजरने लिहिलेय, “नादखुळा गं”