Viral Video lavish gift showering for Toddler : बर्थडे म्हणजे वाढदिवस प्रत्येकाच्या आयुष्यातील खास असा दिवस असतो. आपल्या या दिवशी सगळ्यांनी शुभेच्छा द्याव्यात, आपल्याला गिफ्ट द्यावं असं अनेकांना वाटतं. काही लोक तर स्वतःच्या बर्थडेसाठी इतके उत्साही असतात की, स्वतःच आपल्याला काय गिफ्ट हवं हे सगळ्यांना सांगून ठेवतात. त्यातच पहिला वाढदिवस असेल तर अगदी हॉल घेऊन त्या एक वर्षाच्या मुला-मुलीचा वाढदिवस साजराला केला जातो. पण, त्याला अगदी लग्नात दिले जातात अशे गिफ्ट देण्यात आले आहेत.

ज्या वयात बहुतेक बाळं अजून चालायला शिकत असतात, त्या वयात उत्तर प्रदेशातील अलीगढमधील एका वर्षाच्या चिमुकल्यालाल मालमत्ता, मौल्यवान वस्तू आणि मोठी रोकड भेटवस्तू यांचा मालक बनला आहे. मुलाचे मामा अखिलेश चौहान यांनी भाच्याच्या पहिल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर केला आहे. जिथे भेटवस्तूंची मोठ्याने घोषणा केली जाते आहे.

ज्याला धड चालताही येत नाही, त्या वाढदिवसाच्या दिवशीच शिवायला अलिगढ-आग्रा महामार्गावर एक जमिनीचा तुकडा, ११ लाख रुपये रोख रक्कम, २० ग्रॅम सोन्याची साखळी, देवी लक्ष्मी आणि गणपतीच्या चांदीच्या मूर्ती, हात आणि पायांसाठी चांदीच्या बांगड्या, ५०० ग्रॅम वजनाची चांदीची पाच भांडी, १५ जोड्या कपडे आणि विविध प्रकारची खेळणी भेट म्हणून देण्यात आली.

दिलं तर दिलं माईकवरून का सांगितलं (Viral Video)

त्यातच संपत्तीची उधळपट्टी केल्याशिवाय कोणताही थाट पूर्ण होत नाही, म्हणून शिवाच्या आईलाही भेटवस्तू देण्यात आल्या आहेत; ज्यात ३५ ग्रॅम सोन्याचा हार, सोन्याच्या बांगड्या, अंगठी, कानातले, चांदीचे पैंजण आणि अनेक कपड्यांचा समावेश होता. एवढंच नाही तर मुलाची आजी आणि मावशी यांनाही समारंभात भेटवस्तू देण्यात आल्या, ज्यात सोन्याच्या अंगठ्या, चांदीचे पैंजण आणि कपड्यांचा समावेश होता.

व्हिडीओ नक्की बघा…

viral video

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @akhilesh_chauhan_2000 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी तर व्हिडीओ बघून शॉक झाले आहेत आणि “आत्ता हेच बघायचं बाकी होतं”, “लग्न आहे की वाढदिवस”, “लग्नात कमी होतं जे आत्ता वाढदिवसाला सुद्धा सुरु केलं आहे”, “आम्हाला त्या मुलाच्या बाबांची दया येत आहे”, “दिलं तर दिलं माईकवरून सांगायची काय गरज होती” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत…