Leopard Attack On Delivery Boy Viral Video : आपण प्राण्यांना पाहण्यासाठी नॅशनल पार्क, प्राणीसंग्रहालय किंवा राणीची बाग यांसारख्या ठिकाणी जायचो. मात्र, दुर्दैवाने बेसुमार वृक्षतोड, वाढते शहरीकरण, मॉल्स आणि उंच इमारतींच्या बांधकामांमुळे जंगलांचे क्षेत्र झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत असून, अन्न आणि निवाऱ्याच्या शोधात ते आता गावांमध्ये, शहरांच्या उपनगरांत आणि रस्त्यांवरही दिसू लागले आहेत. असाच एक भीतीदायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
मध्य प्रदेशातील इंदूरच्या बिचोली मर्दाना परिसरातील निर्जन रस्त्यावर मध्यरात्रीची वेळ होती. रस्त्यावर अंधार पसरलेला होता आणि ना कोणती वाहने, ना माणसांची वर्दळ होती. त्याचवेळी एक डिलिव्हरी बॉय दुचाकीवरून त्या रस्त्याने जात असताना अचानक समोरून बिबट्याची एंट्री झाली. बिबट्याला पाहताच दुचाकीस्वाराने तत्काळ ब्रेक लावून गाडी थांबवली. मात्र, काही क्षणांतच बिबट्याने त्याच्यावर झडप घालत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने बिबट्याचा अंदाज चुकला आणि डिलिव्हरी बॉयने प्रसंगावधान राखत दुचाकीवरून उडी मारून जीवाच्या आकांताने पळ काढला. त्यामुळे हा थरारक प्रसंग असूनही त्याचा जीव थोडक्यात बचावला.
डिलिव्हरी रायडरची सुटका झाली का? (Viral Video )
ही थरारक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सुदैवाने, प्रसंगावधान राखत डिलिव्हरी रायडरने तात्काळ स्वतःची सुटका केली आणि पळून जाऊन आपला जीव वाचवला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभाग आणि स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा धक्कादायक व्हायरल व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
हा व्हिडीओ @loksattalive या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक लोक घाबरले आहेत. त्यामुळे रात्री उशिरा या भागातून जाताना काळजी घेणे आणि सतर्क राहणे योग्य ठरेल असे सध्या तरी चित्र दिसते आहे.
