Viral Video: हल्ली सोशल मीडियावर जंगलातील वन्यजीवांचे अनेक रोमांचक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. जंगलात प्राण्यांचे शिकारीचे थरारक क्षण, एकमेकांमधील संघर्ष, त्यांच्या अनोख्या हालचाली तसेच निसर्गातील विविध दृश्ये कॅमेऱ्यात कैद होतात. असे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. जंगलातील प्राण्यांचे जवळून पाहायला मिळणारे हे क्षण अनेकदा आश्चर्यचकित करणारे तर कधी अंगावर काटा आणणारे असतात. त्यामुळे वन्यजीवांशी संबंधित व्हिडीओंना सोशल मीडियावर मोठी पसंती मिळताना दिसते.

जंगलातील प्रत्येक प्राण्याचे जीवन हे निसर्गाच्या अन्नसाखळीवर अवलंबून असते. स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी अनेक प्राणी थेट किंवा अप्रत्यक्षपणे दुसऱ्या प्राण्यांवर अवलंबून असतात. काही प्राणी शिकार करून आपली भूक भागवतात, तर काही प्राणी मोठ्या शिकारी प्राण्यांची शिकार झाल्यामुळे अन्नसाखळीचा भाग बनतात. त्यामुळे जंगलात जगण्यासाठी संघर्ष करताना एक प्राणी दुसऱ्या प्राण्याच्या जीवनाशी जोडलेला असतो. निसर्गात प्रत्येक जीवाचे अस्तित्व हे दुसऱ्या जीवाशी कुठल्या ना कुठल्या प्रकारे जोडलेले असते.

बिबट्या हा जंगलातील अत्यंत चपळ आणि कुशल शिकारी म्हणून ओळखला जातो. आपल्या वेगवान हालचाली, ताकद आणि योग्य संधी साधण्याच्या कौशल्यामुळे तो भक्ष्याचा पाठलाग करून शिकार करण्यात तरबेज असतो. बिबट्या अनेकदा दबकत दबकत भक्ष्याच्या जवळ जातो आणि योग्य क्षण साधून अचानक हल्ला करतो. त्याची चपळता आणि शिकारीची अनोखी पद्धत पाहण्यासारखी असते. सोशल मीडियावर बिबट्याच्या शिकारीचे असे अनेक व्हिडीओ समोर येतात, ज्यातून त्याच्या या विलक्षण शिकारी कौशल्याची झलक पाहायला मिळते.

सध्या सोशल मीडियावर बिबट्याच्या शिकारीचा एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये बिबट्याने मोठ्या हुशारीने रानडुक्कराच्या पिल्लाची शिकार केल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीला तो रानडुकराला आपल्या पिल्लापासून दूर करतो व योग्य संधी साधत बिबट्या पिल्लाच्या जवळ जातो आणि अचानक त्याच्यावर हल्ला करतो. बिबट्याची चपळता, सावध हालचाली आणि शिकार करण्याची पद्धत या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हा थरारक क्षण कॅमेऱ्यात कैद झाल्याने वन्यजीवप्रेमींचे लक्ष या व्हिडीओकडे वेधले जात आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ युट्यूबवरील @Incredible Wild Lion Sightings या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “एकाला जगण्यासाठी दुसऱ्याला मरावं लागतं” एका युजरने लिहिलेय, “खूपच भयानक डाव.” आणखी एका युजरने लिहिलेय, “बिबट्यासारखं चपळ कोणीच नाही”