सोशल मीडियावर रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल होतच असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही व्हिडीओ आपल्याला गंभीर करणारे असतात. मात्र काही व्हिडीओ असेही असतात, जे पाहिल्यानंतर आपल्याला भिती वाटते आणि निसर्गाचं रौद्र रुप कसं असतं, याची प्रचिती येते. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक भागांत ढगांचा गडगडाट ऐकू येतो. पाऊस येण्यापूर्वी ढग गडगडायला सुरुवात होते आणि थोड्याच वेळा विजा चमकू लागतात. त्यानंतर पाऊस सुरु होतो आणि ढगांचा गडगडाट वाढायला सुरुवात होते. विजा कडाडल्याचे आवाज हळूहळू वाढत जातात आणि आजूबाजूला कुठेतरी वीज कडाडल्याची बातमी दुसऱ्या दिवशी आपल्याला समजते. मात्र वीज पडताना आपण कधी प्रत्यक्ष पाहिलेलं नसतं. अनेकांनी वीज कोसळल्यावर नेमकं काय होतं, याचा अनुभवही घेतलेला असतो. मात्र आकाशाकडे नजर लावून वीज पडण्याच्या नेमक्या क्षणी आकाशात काय घडतं, हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्याची संधी मिळणं फारच दुर्मिळ मानलं जातं. मात्र डोळ्यांनी प्रत्यक्ष हे पाहण्याची संधी मिळाली नाही, तरी निसर्गाचे असे चमत्कारिक प्रसंग कॅमेऱ्यात मात्र कैद होतात.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा ब्रिटनमधला आहे. ब्रिटनमध्ये एका नव्याकोऱ्या घरावर वीज कोसळलीय. यूकेच्या कॉर्नवॉलमध्ये ही घटना घडलीय. रेडरूथच्या काठावर एका नव्याने बांधलेल्या घराच्या छतावर वीज पडल्याचे दृश्य या व्हिडीओमध्ये दिसत आहे. ही घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. याचा व्हिडीओ सध्या तेजीने व्हायरल होतोय.

आणखी वाचा : स्वावलंबी आजी! मुंबई लोकलमध्ये चॉकलेट विकून स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, VIRAL VIDEO पाहून भावूक व्हाल!

इथल्या अग्नीशमन दलाने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. वीज पडताना नेमकं काय घडतं आणि आकाशात काय चित्र दिसतं, हे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांच्या लक्षात येतं. काही क्षणांचा हा व्हिडिओ आहे, मात्र त्यातून एक मोठी नैसर्गिक प्रक्रिया प्रत्यक्ष कशी घडते, हे पाहण्याची संधी मिळते. या व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या घराचं नव्याने बांधकाम सुरू होतं. ही वीज घराच्य एका कोपऱ्यावर पडलेली दिसत आहे आणि यात कोपऱ्यातून काहीतरी तुटून खाली पडलेलं दिसत आहे. यातील आवाज सुद्धा अंगावर शहारे आणणारा आहे.

आणखी वाचा : कुत्रा विरूद्ध पाणकुत्रा, पाहा कुणी मारली बाजी, हा गोंडस VIRAL VIDEO पाहून मन प्रसन्न होईल

टोलवडन कम्युनिटी फायर अँड रेस्क्यू स्टेशनने हा व्हिडीओ फेसबूक अकाउंटवरून शेअर केलाय. या व्हिडीओसोबत घटनेची माहिती सुद्धा शेअर करण्यात आलीय. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. सुदैवाने कर्तव्यदक्ष अधिकारीही या घटनेत बचावले. पण या घटनेमुळे इमारती आणि दोन पंपांचे किरकोळ नुकसान झाले. अग्निशमन दलाने लोकांना घटना शोधण्यात अग्निशामकांना मदत करण्यासाठी ‘व्हॉट 3 वर्ड्स’ वापरण्याचा सल्ला दिला. हा एक अॅप असून घटनेचे स्थान लवकरात लवकर शोधण्यासाठी मदत होते.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नेत्याने उद्घाटनाची फीत कापताच नवाकोरा पूल पत्त्यासारखा कोसळला!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : खतरनाक! चवताळलेल्या हत्तीने भररस्त्यात कारला अडवलं आणि मग जे केलं ते पाहा…

हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येतोय. या व्हिडीओला आतापर्यंत २९ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हे भयानक दृश्य पाहून सोशल मीडिया यूजर्सना धक्काच बसला. ज्या भागात लोकांना नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो, त्या भागातील लोकांचं दैनंदिन जगणं किती आव्हानात्मक असू शकतं, याची कल्पना हा व्हिडिओ पाहून येऊ शकते. अनेकजण हा व्हिडिओ फॉर्वर्ड करत आहेत आणि वीज पडण्याची प्रक्रिया कशी दिसते, ते एकमेकांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियात हा व्हिडिओ सध्या आकर्षणाचं केंद्र ठरत आहे.