Viral Video: सोशल मीडियावरील जंगलातील प्राण्यांचे अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. जंगलातील प्राण्यांबाबतीतल्या अनेक गोष्टी पाहण्यासाठी युजर्सही नेहमीच उत्सुक असतात. आतापर्यंत तुम्ही अनेक व्हिडीओंमध्ये वाघ, बिबट्या, सिंह किंवा चित्ता या हिंस्र प्राण्यांना नेहमीच इतर प्राण्यांची शिकार करताना पाहिले असेल. प्राण्यांची शिकार करण्यासाठी या हिंस्र प्राण्यांना अनेक प्रयत्न करावे लागतात. अगदी आपली शिकार शोधण्यापासून ते ती शिकार मिळवण्यापर्यंत हे हिंस्र प्राणी खूप मेहनत घेतात. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
जगातील कुठलाही सजीव असो, प्रत्येक जण आपली भूक भागवण्यासाठी संघर्ष करत असतो. मनुष्य आपली दोन वेळची भूक मिटवण्यासाठी आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र कष्ट करतात, त्याचप्रमाणे हिंस्त्र प्राणीदेखील आपली भूक भागवण्यासाठी जंगलातील प्राण्यांवर हल्ला करून आपली भूक भागवतात. हिंस्र प्राण्यांसाठी ज्याप्रमाणे आपली भूक भागवणं गरजेचं असतं, त्याचप्रमाणे ज्या प्राण्याचा जीव धोक्यात असतो त्यालाही आपला जीव वाचावा असं वाटतं, त्यामुळे तोदेखील जिवाच्या आकांताने शिकार होण्यापासून वाचण्यासाठी पळत असतो. अनेकदा त्यांची ही धाव यशस्वी होते तर अनेकदा त्यांना आपला जीव गमवावा लागतो. दरम्यान, आता असाच एक थरारक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एक सिंह झेबऱ्यावर हल्ला करताना दिसत आहे.
समाजमाध्यमांवर अनेक व्हिडीओ आपल्या नजरेस पडत असतात, ज्यात काही प्राण्यांचेही व्हिडीओ पाहायला मिळतात. बऱ्याचदा जंगलातील प्राण्यांच्या या व्हिडीओंमध्ये ज्यात कधी हिंस्र प्राणी इतर प्राण्याची शिकार करताना दिसतात, तर अनेकदा काही प्राणी एकमेकांबरोबर खेळताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सिंह एका झेब्रऱ्याची अतिशय क्रूर पद्धतीने शिकार करताना दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका जंगलामध्ये भुकेने चवताळलेला सिंह शिकारीच्या शोधात असताना त्याची नजर झेबऱ्याच्या कळपावर जाते. यावेळी एका झेबऱ्याच्या पिल्लावर हल्ला करण्यासाठी सिंह चवताळतो आणि प्रचंड वेगाने त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच वेळानंतर त्याची ही धाव यशस्वी होते. सिंह झेबऱ्याच्या पिल्लाची अतिशय क्रूर पद्धतीने शिकार करतो.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ युट्यूबवरील @BCC या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याच्या कॅप्शनमध्ये, “सिंहाने झेबऱ्याला मारलं” असे लिहिले आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत मिलियन्समध्ये व्ह्यूज मिळाल्या असून यावर हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करताना देखील दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “बिचारे पिल्लू”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “वाईट अंत झाला पिल्लाचा”, तर आणखी एकाने लिहिलंकी, हे जग आहे, “इथे एकाला जगण्यासाठी दुसऱ्याला मरावं लागतं”
