scorecardresearch

एक-दोन नव्हे तर तब्बल ४० भुकेल्या मगरींनी सिंहिणीला घेरलं, मेलेल्या पाणघोड्याच्या मदतीने केली सुटका!

या ४० मगरी आपल्या शिकारीसाठी पुरेपुर प्लान आखतच होत्या, पण घाबरलेल्या सिंहिणीने मेलेल्या पाणघोड्याच्या मदतीने आपला जीव वाचवला. तुम्हाला विश्वास बसणार नाही. त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

Lion-Crocodiles-Viral-Video
(Photo: Youtube/ Compass Media )

सिंह कोणत्याच परिस्थितीत आपली शिकार सोडत नाही. ते आपल्या धारदार नखांनी मोठ-मोठ्या प्राण्यांना काही मिनीटांत फस्त करतात. मात्र प्रत्येक वेळी जंगलाचा राजा सिंहाला त्याच्या शिकारीत यश मिळेलंच असं नव्हे. कधी कधी ते सुद्धा घाबरतात. आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडीओ दाखवणार आहोत. समोर एक-दोन नव्हे तर तब्बल ४० मगरींची झुंड पाहून सिंहीण चांगलीच घाबरली. या ४० मगरी आपल्या शिकारीसाठी पुरेपुर प्लान आखतच होत्या, पण घाबरलेल्या सिंहिणीने मेलेल्या पाणघोड्याच्या मदतीने आपला जीव वाचवला. तुम्हाला विश्वास बसणार नाही. त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

हा व्हिडीओ यूट्यूबवर लोकांना आश्चर्यचकित करत आहे. हा व्हिडीओ अँटोनी पेसी नावाच्या व्यक्तीने शूट केला आहे. ही घटना केनियामधल्या मसाई मारा नॅशनल रिझर्व्ह परिसरात घडली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सिंहीण  मगरींच्या झुंडीत अडकलेली दिसत आहे. या सिंहिणीला चारही बाजूने पाण्यातून डोकावणाऱ्या मगरींनी घेरलंय. जस जश्या या मगरी सिंहिणीला आपली शिकार बनवण्याच्या अॅक्शनमध्ये येतात, तस तशी ही सिंहीण आपली सावध भूमिका घेताना दिसतेय. मगरींना घाबरलेली सिंहीण पाहून सुरूवातीला सारेच जण थक्क होतात. चारही बाजूने घेरलेल्या मगरी पाहून एका वेळसाठी असं वाटू लागतं की, आता ही सिंहीण इथून आपली सुटका करून घेऊ शकणार नाही आणि या मगरी सिंहिणीला आपली शिकार बनवतील. पण ही सिंहीण इतका हूशार निघते की पुढच्या काही मिनिटात तिने डावच उलटवून लावला.

आणखी वाचा : किचनमध्ये काम करताना मुलीने गायलेलं कोक स्टुडिओमधलं ‘Pasoori’ गाणं VIRAL, सुरेल आवाजाने तुम्ही प्रसन्न व्हाल!

पुढे ती ज्या पद्धतीने स्वतःचा जीव वाचवते, ते एखाद्या अॅक्शन चित्रपटातील सीनपेक्षा काही कमी नाही. ही सिंहीण एका मेलेल्या पाणघोड्यावर उभी असलेली दिसून येतेय. मगरींची झुंड अगदी तिच्या जवळ येताच एखाद्या हिरोप्रमाणे ती मगरींच्या झुंडीत उडी मारते आणि पाण्यातून वाट काढत बाहेर येते. सिंहिणीने उडी मारल्यानंतर तरी एखाद्या मगरींनी तिला आपली शिकार केली असेल, असं सुद्धा नंतर वाटू लागतं. पण ही सिंहीण आपल्या चतुराईने अंगाला साधं खरचटून सुद्धा न देता सुखरूप बाहेर पडते.

आणखी वाचा : अविश्वसनीय! शिकार समोर असून खतरनाक वाघांनी केला नाही हल्ला; VIRAL VIDEO पाहून कारण सांगू शकाल का?

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : डॉमिनोज पिझ्झा गर्लला लेडी गॅंगकडून बेदम मारहाण, VIRAL VIDEO पाहून लोक थक्क

हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय. हा व्हिडीओ व्हायरल होताच लोक यावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर करताना दिसून येत आहेत. काही युजर्सनी सिंहीण घाबरलेली पहिल्यांदाच पाहिलं असल्याचं सांगितलं तर काही युजर्सनी सिंहिणीच्या हूशारीचं कौतूक केलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-06-2022 at 18:45 IST

संबंधित बातम्या