Viral Video: आज संपूर्ण राज्यात आषाढी एकादशी साजरी होत आहे. या निमित्ताने फक्त पंढरपुरातच नाही तर संपूर्ण राज्यातील मंदिरांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी भजन, कीर्तन, दिंडी काढली जाते. तसेच या दिवशी शाळा, महाविद्यालयांमध्येदेखील दिंडी काढतात, यावेळी विद्यार्थीदेखील वारकऱ्यांसारखी वेशभूषा करतात. या संदर्भातील अनेक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एका चिमुकलीला गोड सजवण्यात आलं आहे. हल्ली लोक आपल्या एक वर्षाखालील लहान मुलांचे प्रत्येक महिन्यात विविध थीमनुसार फोटोशूट करतात, ज्यात बऱ्याचदा महिन्यातील सणांनुसार थीम ठरवली जाते. नुकत्याच व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका लहान गोंडस मुलीला आषाढी एकादशीनिमित्त रखुमाईसारखे सजवण्यात आले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका चिमुकलीला खणाची साडी नेसवली असून तिला सुंदर दागिने घालण्यात आले आहेत, यावेळी तिच्या नाकात नथही घातली आहे आणि कपाळावर चंद्रकोर लावली आहे. यावेळी तिचे बाबा तिचे केस विंचरताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हेही वाचा: ‘फादर ऑफ द इयर…’ भरपावसात स्वतः छत्री घेतली अन् मुलाला भिजवलं VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “क्या बाप बनेगा रे तू” पाहा व्हिडीओ: हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @achal.photography या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर आतापर्यंत दहा मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. तसेच यावर आतापर्यंत आठ लाखांहून अधिक लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. युजर्सच्या कमेंट्स चर्चेत (Viral Video) एका युजरने लिहिलंय की, "तिची नजर काढा, खूप गोड दिसतेय ती", दुसऱ्या युजरने लिहिलंय की, "अगं बाई, किती ग गोड दिसते रखुमाई", तर तिसऱ्याने लिहिलंय की, "आज खरंच रुक्माईचे दर्शन झाल्यासारखे वाटले." तर आणखी एकाने लिहिलंय की, "आई जगदंबेचं रूप, आई जिजाऊंचे बालपण पाहिल्यासारखं वाटले." दरम्यान, यापूर्वीदेखील लहान मुलींचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते, ज्यात एका लहान मुलीला देवीसारखे सजवण्यात आले होते; तर दुसऱ्या व्हिडीओत एका चिमुकलीला जिजाऊंसारखे सजवण्यात आले होते.