Viral Video: आई आपल्या मुलांना जीवापाड जपते. मुलांना योग्य संस्कार लावणं, त्यांना चांगल्या-वाईट गोष्टी समजावून सांगणं, मुलांचे लाड करणं किंवा त्यांच्यावर रागावणं हे सर्व आईच करू शकते. आईचा ओरडा खाणं आपल्यासाठी नवीन गोष्ट नाही. आपल्या वाईट गोष्टींवर नेहमीच आईचे लक्ष असते, ज्यावरून ती आपल्याला सतत ओरडत असते. दरम्यान, आई ओरडते म्हणून अनेकदा आपल्याला तिचा राग येतो. आताही असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक चिमुकली आई ओरडली म्हणून तिच्या आईवर रुसल्याचे दिसत आहे.

या जगात अशी एकही व्यक्ती नसेल, जिने तिच्या आईचा ओरडा किंवा मार खाल्ला नसेल. प्रत्येक व्यक्ती आयुष्यात किमान एकदा किंवा अनेकदा आईचा ओरडा किंवा मार खातेच. आतादेखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. त्यात आईवर रुसलेली चिमुकली बाबांकडे आईची चुगली करताना दिसतेय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकली म्हणतेय, “आई, मला निघ घराच्या बाहेर म्हणाली. मी तिची पोरगी आहे… तरी मला असं म्हणाली”. त्यावर तिचे बाबा तिला विचारता, “तू, आईला त्रास दिला होतास का?”. मग चिमुकली म्हणते, “तिचं मला दमवत्या… आता तुम्ही तिला हॉस्टेलला टाका”. या निरागस चिमुकलीचा हा रुसवा सोशल मीडियावर सध्या खूप चर्चेत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्टाग्रामवरील @tales_by_sugarlips या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास तीन लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एकानं कमेंटमध्ये लिहिलंय, “पोरीला वेण्या फार छान दिसतात आणि बोलते फार गोड”. दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “लहान लेकरं खूप निरागस असतात. खूप छान व्हिडीओ”.