little girl dance on shararat song : कथेपासून ते अगदी गाण्यांपर्यंत ‘धुरंधर’ चित्रपटाची बरीच चर्चा सोशल मीडियावर झाली. पण चित्रपटातील ‘शरारत’ गाण्याची क्रेझ काही वेगळीच ठरली. या गाण्यामध्ये आयशा खान व क्रिस्टल डिसूझाने हटके परफॉर्ममन्स केला. त्यामुळे या गाण्यावर हुक स्टेप करत इन्स्टाग्राम देखील बरेच डान्स व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर अशाच एका ग्रुपचा डान्स व्हिडीओ व्हायरल होतो आहे; ज्यामध्ये चिमुकलीने जबरदस्त डान्स करून सगळ्यांची म्हणजे जिंकली आहेत…
‘शरारत’ ट्रेंडिंग गाण्यावर एक महिलांचा ग्रुप डान्स करताना दिसतो आहे. पण, या ४ महिलांमध्ये डान्स करणाऱ्या चिमुकलीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. चिमुकलीने चौघींच्या मध्ये उभं राहून असा डान्स केला आहे की, तुमची तिच्या प्रत्येक स्टेपवरून नजर हटणार नाही. तिचे हावभाव, तिच्या स्टेप्स सगळ्या इतक्या परफेक्ट आहेत की, तिच्या बाजूला डान्स करणाऱ्या कोणत्याच महिलेला तिच्या डान्स स्टेप्सशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत, जणू काही ही चिमुकली त्यांची डान्स टीचरच आहे.
चिमुकलीचा कॉन्फिडन्स लेव्हल मस्त आहे (Viral Video)
सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. यात मजेशीर तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. कधी मेट्रोत डान्स, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, कधी रस्त्यांवर फक्त प्रसिद्धी मिळावी यासाठी अनेक प्रकारचे व्हिडीओ अनेक जण करत असतात. पण, व्हायरल व्हिडीओतील चिमुकली सारखं खरं टॅलेंट फार कमी बघायला मिळते. या चिमुकलीचा डान्स फॉलो करणं किंवा तिची हुबेहूब नक्कल करणे या महिलांनाही मनापासून आवडते आहे असे म्हणायला हरकत नाही.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @swapnaliguddu23 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘वाह, मी तिची फॅन झाले आहे! खरंच, ती खूपच छान नाचते आहे. तिला कधीही नाचण्यापासून थांबवू नका. नृत्य तिच्या रक्तातच आहे, ती जन्मतःच एक उत्तम डान्सर आहे’, ‘बाकी सगळ्यांनी थोडा तरी जोश दाखवा’, ‘तिचा कॉन्फिडन्स लेव्हल… व्वा! खरंच भन्नाट आहे’, ‘तीच वय बघता तिचा कॉन्फिडन्स कमाल आहे’, ‘माझं पूर्ण लक्ष फक्त लहान चिमुकली वरच होतं काय डान्स केला एक नंबर’ ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत…
