VIRAL VIDEO : या चिमुकल्या मुलीने इतकं भन्नाट लोकनृत्य सादर केलंय की तुम्ही पाहतच राहाल!

या व्हिडीओमध्ये ही मुलगी पारंपारिक नृत्य सादर करताना तिचे डान्स मूव्ह्स मात्र पाहण्यासारखे आहेत.

VIRAL VIDEO : या चिमुकल्या मुलीने इतकं भन्नाट लोकनृत्य सादर केलंय की तुम्ही पाहतच राहाल!
(Photo: Twitter/ VisitUdupi)

लहान मुलांचे व्हिडीओ नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेतात, मग ते खेळणे असो, नाचणे असो, गाणे असो किंवा इतर कसलेही व्हिडीओ असो. अशातच आता एका मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पाहून लोक तिच्यासाठी वेडे झाले आहेत. खरं तर, हा व्हिडीओ कर्नाटकातील उडुपीमधला आहे. पण भर रस्त्यावर एका गोंडस मुलीने जे लोकनृत्य सादर केलंय ते पाहून लाखो लोक तिच्या प्रेमात पडू लागले आहेत. या व्हिडीओमध्ये ही मुलगी पारंपारिक नृत्य सादर करताना तिचे डान्स मूव्ह्स मात्र पाहण्यासारखे आहेत.

२३ सेकंदांच्या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी एका महिलेला रस्त्यावर पारंपारिक नर्तकांकडे आकर्षित करताना दिसत आहे. मुलीसह महिलेने सुरूवातीला नृत्यांगना हार घालून तिच्या अभिनयाचा गौरव केला. त्यानंतर नर्तक मुलीला तिच्यासोबत नाचण्याचा आग्रह करताना दिसते. तिच्या म्हणण्यावरून ही लहान मुलगी लगेचच तिच्या डान्स मूव्हची कॉपी करताना थिरकताना दिसते. मुलीच्या या परफॉर्मन्सला कार्यक्रमाला उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कटकडाटात दाद दिली.

आणखी वाचा : हत्तीण बाळाला जन्म देत होती, कळपाने असा साजरा केला क्षण, VIRAL VIDEO एकदा पाहाच!

मुलीच्या डान्सचा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करू लागले आहेत. हा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांकडून अनेक मजेदार कमेंट येत आहेत. VisitUdupi नावाच्या एका ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. ‘ओएमजी! हे खूप सुंदर आहे.’ असं कॅप्शनमध्ये लिहित हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला ५ लाख ७१ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ३१ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. या लहान मुलीसाठी गोंडस कमेंट्सचा तर जणू पुरचा आला आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ट्रॅफिक सिग्नलवर लेझर तलवारी विकणाऱ्या या व्यक्तीचं टॅलेंट पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : माणुसकी अजूनही जिवंत आहे! हा VIRAL VIDEO पाहून तुम्हीही हेच म्हणाल!

एका युजरने लिहिले की, मुलीने खूप छान डान्स केला आहे, यासाठी तिच्या पालकांचे अभिनंदन. आणखी एका यूजरने लिहिले की, “मुलगी सुपरस्टार आहे.” आणखी एका युजरने ट्विट केले की, आपण आपल्या मुलांना शिकवले पाहिजे आणि प्रोत्साहित केले पाहिजे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video little girl joins folk dance on the streets of karnataka funny comments comming prp

Next Story
वराने लग्नात केले असे कृत्य की वधूसोबत नातेवाईकांनाही बसला धक्का; पहा हा VIRAL VIDEO
फोटो गॅलरी