scorecardresearch

आईला वैतागून चिमुकलीने देवाकडे केली ही प्रार्थना, Viral Video पाहून तुम्ही सुद्धा पोट धरून हसाल

लहान मुल हे देवाघरची फुल असतात असे नेहमीच म्हटले जाते. पण यात मुलांना जेव्हा राग येतो तेव्हा यांच्या मनात कधी काय येईल, कुणीत सांगू शकणार नाही.

kids-viral-video
(Photo: Instagram/ raavya_020316)

लहान मुल हे देवाघरची फुल असतात असे नेहमीच म्हटले जाते. तसेच प्रत्येक आई-वडिल आपल्या मुलावर प्रेम करतात. त्यांना कधीही दु:ख होऊ नये म्हणून नेहमीच त्यांच्यासाठी धडपड करताना दिसून येतात. पण लहान मुलं या सगळ्याला वैतागतात. एकदा का या लहान मुलांना राग आला तर मग पुढे ते काय करतील, याचा काही नेम नसतो. कधी त्यांच्या मनात कोणता विचार येईल, हे कुणीच सांगू शकत नाही. असाच एक मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्ही अक्षरशः पोट धरून हसाल, हे मात्र नक्की.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक चिमुकली तिच्या आईला भरपूर वैतागलेली दिसून येतोय. इतकी वैतागला आहे की थेट तिने देवाकडे प्रार्थनाच केली आहे. अभ्यासावरून आईच्या किटकिटला ही मुलगी वैतागून देवाकडे एक विशेष प्रार्थना करताना दिसून येतेय. या लहान मुलांना घरी अभ्यास करून घेणं हा प्रत्येक आईसाठी मोठा टास्क असतो. आई सतत घेत असलेल्या अभ्यासाला कंटाळून या मुलीने थेट देवालाच आता साकडे घातले आहे आहे. हा व्हायरल व्हिडीओ तुम्ही एकदा पाहिल्यानंतर तो वारंवार पाहण्याचा मोह तुम्हाला आवरता येणार नाही.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एका आईने आपल्या चिमुरडीला तिच्या अभ्यासासाठी खडसावले, तेव्हा ती भडकलेल्या आईवर रागावली आणि म्हणू लागली, ‘देवा मला बदल आणि मला दुसरी आई दे, तू कोणती आई घडवलीस.’ यावर ती आई सुद्धा बोलते, “चल लवकर लिही लवकर आणि ही मुलगी आईच्या दबावाला कंटाळली आहे म्हणे…”

आणखी वाचा : Viral Video : स्नोबोर्डिंग करताना मुलगी स्वतःशीच बोलते, गोंडस व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर स्माईल येईल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : ‘कच्चा बादाम’वर शाळकरी मुलीने केला क्यूट डान्स, पाहा हा VIRAL VIDEO

हा व्हायरल व्हिडीओ पाहून लोकांना त्यांचं हसू आवरणं कठीण होऊन झालं आहे. या व्हायरल व्हिडीओमधल्या मुलीची देवाकडे केलेली प्रार्थना ऐकून आणि तिचे हावभाव पाहून सोशल मीडिया युजर्सनी या व्हिडीओवर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय. हा व्हिडीओ बघता बघता इतका व्हायरल झाला की आतापर्यंत या व्हिडीओला ४७ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ४ मिलियनपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे.

लहान मुलांचे कोणतेही व्हिडीओ असू द्यात, ते सोशल मीडियावर झटकन व्हायरल होतात आणि लोकांना असे व्हिडीओ पाहणं फारच आवडतं. लोक या व्हिडीओला भरपूर आनंद घेत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video little girl says god change my mother and give me another one prp