Little Girls Dance viral video : लग्न असो, वाढदिवस असो किंवा घरातील कोणताही कार्यक्रम डान्स तर झालाच पाहिजे. डान्सशिवाय कोणतेही सेलिब्रेशन पूर्णच होत नाही. गाणं लागताच पाय आपोआप थिरकायला लागतात आणि मग लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण ताल धरताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये दोन चिमुकल्यांनी त्यांच्या डान्सने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

शाहिद कपूर, क्रिती सेनन आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘कॉकटेल 2’ या रोमँटिक कॉमेडी-ड्रामा चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली. या गाण्यांवर अनेक रील्स तयार केले जात असून प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ दिसून आली आहेत. मूळ ‘कॉकटेल’ चित्रपटातील ‘तुम्ही हो बंधू’ हे गाणे आजही चाहत्यांमध्ये नॉस्टॅल्जिया निर्माण करत असले तरीही ‘कॉकटेल 2’ मधील ‘बंधू 2.0’ या गाण्याच्या डान्स स्टेप्सनी लोकांना रील बनवण्यासाठी आकर्षित केले.

व्हायरल व्हिडीओतील या दोन्ही चिमुकल्यांनी अभिनेत्रीला तोडीस तोड देणारा डान्स केला आहे. दोघीनींही चक्क वनपिस घालून असा डान्स केला आहे की, तुमची त्यांच्या प्रत्येक स्टेपवरून नजर हटणार नाही. दोघींचे हावभाव, त्यांच्या स्टेप्स सगळ्या इतक्या परफेक्ट आहेत की, त्यांच्या बाजूला डान्स बघणारेही थिरकताना दिसत आहेत. त्यांचा डान्स करतानाचा आत्मविश्वास आणि क्रिती सेनन आणि रश्मिका मंदानासारख्या केलेल्या हुबेहूब स्टेप्स अगदी बघण्यासारख्या आहेत. एकदा बघाच दोन्ही मुलींचा हा सुंदर डान्स.

व्हिडीओ नक्की बघा…

https://www.instagram.com/sakshigarg_1611/reel/DcTsJK2JDI6

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ या @sakshigarg_1611 इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून ‘शाहिद कपूर, क्रिती सेनन आणि रश्मिका मंदानाला कमेंटमध्ये टॅग करत आहेत’, तर अनेक जण ‘स्काय ब्लू ड्रेसमधली मुलगी खूपच सुंदर! तिच्या डान्सच्या स्टेप्स एकदम परफेक्ट आहेत’, ‘खूपच सुंदर डान्स करत आहेत’, ‘असंच पुढे जात राहा मुलींनो…अप्रतिम!’, ‘डान्सिंग क्विन्स’ ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.