अलीकडेच, लखनऊच्या एका महिलेने वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीत रस्त्यावर एका कॅब चालकाला निर्दयीपणे मारहाण केल्याचा व्हिडीओ ऑनलाइन व्हायरल झाला. त्या व्हिडीओत एक तरुणी भररस्त्यात कॅब चालकाला मारहाण करताना दिसत होती. या चालकानं तिला धडक दिल्याचं ही तरुणी ओरडून सांगत होती. यामुळे नेटीझन्सनी संताप व्यक्त करत महिलेवर शारीरिक हिंसाचाराचा आरोप केला आणि तिला अटक करण्याची मागणी केली.

नेहमीच मारहाण होत होती

आता झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत महिलेने आपली बाजू मांडली आहे. तिचं नाव प्रियदर्शिनी यादव असं आहे. ही घटना कशामुळे घडली याबद्दल विचारले असता, महिलेने आरोप केला की कॅब चालक सिग्नल असूनही ओव्हरस्पीड करत होता आणि तो तिला मारणार होता.तिने पुढे दावा केला की २ वर्षांपासून, १०० लोकांच्या जमावासोबत एक कॅब चालक तिला मारहाण करत होता. तिने असाही आरोप केला की तो जमाव  तिला नेहमीच मारहाण करत होता आणि यूपी पोलिस फक्त उभे राहून पाहत असत. ती पुढे म्हणाली की कॅब चालकासह, इतर १०० लोक होते ज्यांनी तिला मारहाण केली. त्यांनी तिला ३०० मीटरपर्यंत ओढले आणि तिचा हात तोडला.

कॅब चालक म्हणतो माझावर अन्याय झाला

दुसऱ्या मुलाखतीत, कॅब चालक, ज्याची ओळख सादत अली अशी आहे त्याने व्यक्त केले की त्याच्यावर कसा अन्याय झाला. घटनेची आठवण करून देताना त्याने आरोप केला की, महिलेने कॅबचा दरवाजा उघडला, त्याचा मोबाईल घेतला आणि तो तोडला. त्याने पुढे दावा केला की महिलेने त्याचे पैसेही घेतले आणि त्याच्या कारचे नुकसान केले.फर्स्टपोस्टनुसार, कॅब चालकाला मारहाण केल्याप्रकरणी महिलेविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

काय होती घटना?

हा व्हिडीओ लखनऊ शहरातील अवध क्रॉसिंगजवळचा आहे. त्या व्हिडीओत एक तरुणी भररस्त्यात कॅब चालकाला मारहाण करताना दिसत होती. दरम्यान, हा गोंधळ सुरू असताना एक वाहतूक पोलीस तिथं येतो आणि मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, तरीही ती त्या चालकाला मारणं थांबवत नाही. शिवाय त्याचा फोनही तोडून टाकते.