Viral Video: जंगलातील प्राणी हा निसर्गाच्या परिसंस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. सिंह, वाघ, बिबट्या, हत्ती, अस्वल, हरिण, माकड यांसारखे अनेक प्राणी जंगलात आढळतात. प्रत्येक प्राणी अन्नसाखळी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. जंगलातील या प्राण्यांचे जीवन, शिकार आणि एकमेकांशी असलेले संबंध पाहणे नेहमीच रंजक ठरते.

जंगलातील अन्नसाखळी ही निसर्गातील संतुलन राखणारी महत्त्वाची प्रक्रिया आहे. जंगलात वनस्पती आणि गवत यांच्यावर हरिण, ससा, हत्ती यांसारखे शाकाहारी प्राणी अवलंबून असतात, तर सिंह, वाघ, बिबट्या यांसारखे मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांची शिकार करतात. अशा प्रकारे एका जीवाचे अन्न दुसऱ्या जीवासाठी ऊर्जा आणि जगण्याचा आधार बनते. त्यामुळे जंगलातील प्रत्येक प्राण्याचे परिसंस्थेत महत्त्वाचे स्थान असते.

सिंह हा जंगलातील सर्वात शक्तिशाली आणि प्रभावी वन्यप्राण्यांपैकी एक मानला जातो. त्याला जंगलाचा राजा असेही म्हटले जाते. सिंह प्रामुख्याने समूहाने राहतो आणि हरण, रानडुक्कर यांसारख्या प्राण्यांची शिकार करतो. त्याची ताकद, वेग आणि शिकार करण्याची पद्धत नेहमीच आकर्षणाचा विषय ठरते.

आतापर्यंत तुम्ही म्हशीवर सिंहांच्या कळपाने हल्ला केल्याचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. जंगलात शिकारीसाठी सिंह अनेकदा कळपाने एखाद्या प्राण्याचा पाठलाग करताना दिसतात. मात्र काही वेळा शिकारही आपल्या ताकदीचा आणि चपळाईचा वापर करून सिंहांना चकवा देताना पाहायला मिळते. अशाच प्रकारचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात.

आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये तब्बल तीन सिंह एका म्हशीवर हल्ला करताना दिसत आहेत. सिंहांचा कळप म्हशीला घेरून तिच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न करताना दिसतो. जंगलातील हा थरारक प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला असून, व्हिडीओ पाहून नेटकरीही आश्चर्यचकित झाले आहेत.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ युट्यूबवरील @Incredible Wild Lion Sightings या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरनं लिहिलंय, “सिंहाची आज पार्टी झाली”, तर दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “खूप वाईट…”; तर आणखी एकानं लिहिलंय, “बिचारी म्हैस”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “सिंहाच्या पोटासाठी म्हशीला जीव गमवावा लागला”