Viral Video: सोशल मीडियावर सतत विविध गोष्टी व्हायरल होताना आपण पाहतो. यावर व्हायरल होणाऱ्या मजेशीर गोष्टींमुळे नेहमीच आपले मनोरंजन होते. पण, अनेकदा सोशल मीडियावर थरारक घटनादेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात, ज्या पाहून आपला थरकाप उडतो. ज्यात कधी अपघाताचे व्हिडीओ असतात तर कधी मारहाणीचेदेखील व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ दिल्लीच्या नोएडा येथील युनिव्हर्सिटी कॅम्पसमधील असून या ठिकाणी एक पुरुष एका महिलेला बेदम मारहाण करताना दिसत आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सध्या खूप व्हायरलही होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक युजर्स संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नोएडाच्या सेक्टर १२६ मध्ये असलेल्या एमिटी युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये एक पुरुष आणि महिला सुरुवातीला एकमेकांशी काहीतरी बोलताना दिसत आहेत. त्यानंतर अचानक तो पुरुष महिलेच्या कानाखाली मारतो. त्यानंतर ती महिला खाली बसलेली दिसते, तेव्हादेखील तो पुरुष तिला कानाखाली मारतो, त्यानंतर पुढे तो तिला आणखी मारहाण करतो. यावर ती महिला त्याच्यापासून दूर जाऊन त्याला काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करते. मात्र, तो काहीच ऐकून घेण्याचा मनस्थितीत नसल्याचे दिसत आहे. कदाचित कोणत्या तरी गोष्टीवरून या दोघांचा वाद झाल्याचे दिसत आहे.

दरम्यान, या व्हिडीओची आता चौकशी करण्यात आली असून लवकरच या व्हिडीओतील मारहाण करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जाईल, अशी माहिती नोएडा पोलिसांनी दिली. शिवाय याआधीदेखील या कॅम्पसमध्ये अशाप्रकारच्या अनेक घटना घडल्या असल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा: “आई मला ओरडू नको…” मालकिणीचा ओरडा खाऊन श्वानाच्या पिल्लाला आलं रडू , VIDEO पाहून पोटधरून हसाल

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ X (ट्विटर) वरील @Tricity Today या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत जवळपास दोन हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

दरम्यान, यापूर्वीदेखील अशाप्रकारचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यात एक प्रियकर त्याच्या प्रेयसीला भररस्त्यात मारहाण करताना दिसत होता. या व्हिडीओवर कारवाईदेखील करण्यात आली होती.