सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहतो. यातील अनेक व्हिडीओंमुळे आपल्याला जगभरातील कोणत्याही कोपऱ्यातील व्हिडीओ सहज पाहता येतात. यावर कधी सण, उत्सवाचे, डान्स, गाण्याचे तर कधी अपघात, भांडणाचे व्हिडीओ चर्चेत येतात. अनेक जण आपली कला सादर करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. अशा अनेक कलाकारांना सोशल मीडियामुळे जगभरातील लोकांची पसंती मिळते. आताही अशाच एका कलाकाराचा डान्स खूप व्हायरल होत आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी दुःख असतंच. पण, त्या दुःखाकडे दुर्लक्ष करून लोक आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असतात. अनेकांना जन्मापासून हात, पाय नसतात; तर काही जण अपघातामध्ये हात, पाय गमावतात. परंतु, ते अपघातानंतरही हार मानत नाहीत. सध्या अशाच एका व्यक्तींचा डान्स व्हायरल होतोय, जो त्याच्या कृत्रिम पायांवर नाचताना दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक कृत्रिम पाय लावलेली व्यक्ती ‘कांटा लगा’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स स्टेप्स पाहून नेटकरीही कौतुक करत आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @ablurajesh_ या अकाउंटवर शेअर केला असून यावर आतापर्यंत १२ मिलियनहून अधिक व्ह्युज आल्या असून तीन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक जण कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “खूप जबरदस्त भावा.. नेहमी खूश राहा”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “तुझ्या कलेला सलाम”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “याला म्हणतात जिद्द.”