Moonwalk Upside Down Underwater : सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ शेअर होत असतात. काही व्हिडीओ इतके मजेदार असतात की पाहून हसू आवरणं अवघड होऊन जातं. तर अनेक व्हिडीओ इतके भावूक असतात की डोळ्यात पाणी येतं. काही व्हिडीओ हे लोकांच्या टॅलेंटने भरलेले असतात. लोकांचे एकापेक्षा एक असलेले वेगवेगळे टॅलेंट पाहून आश्चर्य वाटू लागतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एका मुलाने स्विमिंग पूलमध्ये चक्क अंडरवॉटर मूनवॉक केलाय. आता तुम्ही म्हणाल, पाण्याखाली मूनवॉक कसं काय शक्य आहे. तर हे या व्हिडीओमधल्या मुलाने शक्य करून दाखवलंय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमधल्या तरूणाचे नाव जयदीप गोहिल असं आहे. त्याला भारतातील ‘हायड्रोमॅन’ म्हणून देखील ओळखलं जातं. जयदीप गोहिलने इनस्टाग्रामवर पाण्याखाली मूनवॉक करताना व्हिडीओ शेअर केला. तो भारतातील पहिला अंडरवॉटर डान्सर असल्याचा दावा देखील करण्यात येतोय. या व्हिडीओमध्ये तो पाण्याखाली जाऊन मायकल जॅक्सनच्या स्मूथ क्रिमिनलवर इन्व्हर्टेड मूनवॉक करताना दिसतोय. या व्हिडीओने मायकल जॅक्सनच्या चाहत्यांना भावनिक केलंय. कारण त्याने मायकल जॅक्सनसारखेच हुबेहूल आयकॉनिक मूनवॉकच्या स्टेप्स केल्या आहेत. त्यामुळे नेटिझन्सला आश्चर्याचा धक्काच बसला आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : भाची हरवल्याची तक्रार करणाऱ्याला इन्स्पेक्टरने चपराक मारली, आता बदली झाली

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हायड्रोमॅन बिलियर्ड टेबलवर पाण्याखाली मूनवॉक करतो आणि नंतर तेच करण्यासाठी उलटा पलटा होताना दिसतोय. जयदीपने पाण्यात ठेवलेल्या पूल टेबलवर हा परफॉर्मन्स सादर केला. या संपूर्ण व्हिडीओमध्ये सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या मुलाने कोणत्याही ऑक्सिजन सिलेंडरशिवाय हा जबरदस्त परफॉर्मन्स दिलाय.

आणखी वाचा : ‘या’ बोगद्यात ट्रेन लाईटशिवाय जाते, पाहा रोमांचक प्रवासाचा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ शेअर करताना जयदीपने एक कॅप्शन देखील लिहिलीय. “माझ्या प्रेक्षकांसाठी ज्यांना माझं हे वर्जन पाहायचं होतं. #moonwalk” असं लिहीत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. जयदीप याचं इन्स्टाग्राम अकाउंट पाहिलं असता त्यावर त्याचे अंडरवॉटर मूनवॉकच्या व्हिडीओंचा जणू खजिनाच दिसून येतोय. वेगवेगळ्या ठिकाणी त्याने केलेले अंडरवॉटर मूनवॉकचे व्हिडीओ तो नेहमीच इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याची मोठी फॅन फॉलोइंग असून जवळपास ७.५ लाखांहून जास्त लोक त्याला फॉलो करत असतात.

आणखी वाचा : पाणी ओसंडून वाहणारा रस्ता ओलांडण्यास मदत करून हा माणूस पैसे कमवतो, पाहा VIRAL VIDEO

नुकताच त्याने शेअर केलेला नवा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. हा व्हिडीओ एकदा पाहून लोकांचं मन भरत नाही. लोक हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहत असून सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर सुद्धा मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. या व्हिडीओला आतापर्यंत ९ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ९ लाखांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.

आणखी वाचा : सापाला फक्त माणूसच नव्हे तर चिंपांझीं सुद्धा घाबरतात, VIRAL VIDEO पाहून पोट धरून हसाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : याला म्हणतात खरं प्रेम! पतीला मागे बसवून आजीने मोपेड चालवली

लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअऱ करत जयदीपच्या टॅलेंटचं कौतूक करताना दिसत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘हा आतापर्यंतचा सर्वात किलर मूनवॉक होता.’ तर दुसऱ्याने लिहिले, ‘हा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर माझं तोंड उघडंच राहिलं.’ आणखी एकाने लिहिले, “अविश्वसनीय.” चौथ्या यूजरने लिहिले की,”सुपर से भी उपर. हे कोणीही करू शकत नाही.” “एमजेचा आत्मा देखील याचे कौतुक करत असेल.” असं देखील एका चाहत्याने लिहिलं आहे.