scorecardresearch

हे काय? माणसाचा पुतळा अचानक उठू लागला… हा खतरनाक VIRAL VIDEO पाहून तुम्हीही घाबराल

कपड्यांच्या दुकानाबाहेर उभे केलेले पुतळे अनेकदा इतके हूबेहूब दिसतात की माणूस आणि पुतळे यांच्यातील फरक करण कधीकधी अवघड होऊन जातं. कल्पना करा की, असाच एक पुतळा अचानक जिवंत माणसाप्रमाणेच हालचाल करू लागला तर ? होय, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही एका मिनिटासाठी घाबरून जाल.

हे काय? माणसाचा पुतळा अचानक उठू लागला… हा खतरनाक VIRAL VIDEO पाहून तुम्हीही घाबराल
(Photo: Instagram/ youtube)

आजकाल कपड्यांच्या दुकानांच्या बाहेर वस्त्र-प्रावरणांची जाहिरात करणारे पुतळे उभे करून ठेवले जातात. कधी कधी हे पुतळे माणसांसारखे इतके हूबेहूब दिसतात की माणूस आणि पुतळ्यांमध्ये कधीकधी फरक करणं अवघड होऊन जातं. कल्पना करा की, असाच एक पुतळा अचानक जिवंत माणसाप्रमाणेच हालचाल करू लागला तर ? होय, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही एका मिनिटासाठी घाबरून जाल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एक प्रॅंक व्हिडीओ आहे. प्रॅंक व्हिडीओ सगळ्यांनाच आवडतात. कित्येक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले असतात. एक नवा प्रँक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या प्रॅंक व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आपल्या मित्राला घाबरवण्‍यासाठी मॅनिकिन्स बनला आहे. सुरूवातीला हा व्यक्ती कॅमेऱ्यासमोर येतो आणि सर्वांना शांत रहा, असं इशाऱ्याने सांगतो. त्यानंतर खोलीतल्या एका कोपऱ्यात ठेवलेल्या इतर पुतळ्यांप्रमाणेच जमिनीवर झोपून जातो. त्यानंतर खोलीत त्याचा मित्र येतो आणि पुतळ्याचे एक एक भाग उचलून घेऊन जातो. जेव्हा शेवटचा पुतळा उचलायची वेळ येते तेव्हा हा पुतळा अचानक उठू लागला. हे पाहून त्याचा मित्र इतका घाबरला की तो जमिनीवर कोसळला. हा प्रसंग पाहून तुम्ही पोट धरून हसाल. एकदा हा व्हिडीओ नक्की पाहा.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : दृष्टिहीन सायकलस्वार डोळसांना देणार रस्ता सुरक्षेचा संदेश; ४५ दिवसांमध्‍ये १२ राज्‍यातून प्रवास करणार

आणखी वाचा : एका बेघर मुलाला मिठी मारणाऱ्या चिमुकल्याने लोकांची मनं जिंकली; हा भावुक VIDEO VIRAL

YouTube च्या अधिकृत Instagram अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओमध्ये वुडी आणि क्लीनी या कॉमेडी जोडीची झलक दिसून येतेय. यात मित्रासोबत असा काही प्रॅन्क केला आहे, की काही वेळ त्याचा मित्र बुचकळ्यात पडला, की हे नक्की काय झालं? आणि विशेष म्हणजे, हे प्रॅन्क जर मित्राऐवजी दुसऱ्या कुठल्या व्यक्तीसोबत झालं असतं तर ती व्यक्ती नक्कीच चिडली असती.

सोशल मीडियावर हा प्रॅंक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून नेटकरी प्रॅंकचा आनंद लुटताना दिसून येत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास चार मिलियन लोकांनी पाहिलंय. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय. काही युजर्स म्हणाले, “माझ्यासोबत असं झालं असतं तर मी पळून गेलो असतो.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-11-2021 at 19:51 IST

संबंधित बातम्या