scorecardresearch

video viral : भर रस्त्यात ऊसानं भरलेल्या ट्रॅक्टरमध्ये चालकाची स्टंटबाजी, अतिशहाणपणा पाहून भडकले यूजर्स

video viral: भर रस्त्यात स्टंटबाजी करणाऱ्या चालकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Man drives overloaded tractor with extreme risk
ऊसानं ओव्हरलोड भरलेल्या ट्रॅक्टरचा व्हिडीओ व्हायरल (सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असतं. यातील काही व्हिडीओ मजेशीर तर, काही धोकादायक स्टंटचे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक ट्रॅक्टर ड्रायव्हर गाडी चालवताना स्टंट करताना दिसत आहे. त्याच्या या उलटसुलट करामती पाहून लोक घाबरून गेले होते. यादरम्यान त्याला अपघात होण्याची भीतीही वाटत नाही. हर्ष गोएंका आणि उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये –

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. एका वळणावरुन हा चालक ट्रॅक्टर चालवतोय मात्र ओव्हरलोड ऊस भरल्यामुळे ट्रॅक्टरची पुढची चाके ही वर उचलली गेली आहेत. मात्र तरीही हा ट्रॅक्टर चालक बिंधास्त ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. हा व्हिडीओ बघताना कोणत्याही क्षणी ट्रॅक्टर उलटा होईल अशी भीती वाटते. या ट्रॅक्टरच्या आजूबाजूलाही अनेक गाड्या आहेत. या ट्रॅक्टरमुळे त्या गाड्यांना वाहतुकीसाठी त्रास होत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप पाहिला जात आहे आणि व्हायरलही होत आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा –

6300 फूट उंचीवरुन घेत होत्या झोका, छोटीशी चूक अन् खडकावरून डायरेक्ट…

नेटकऱ्यांनी दिल्या संतप्त प्रतिक्रिया –

काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केल्या गेलेल्या या व्हिडीओला भरपूर लोकांनी लाईक केले आहे. असे स्टंट करणे किती धोकादायक आहे हे तुम्ही पाहिले दरम्यान जर ट्रॅक्टर उलटला असता तर हा अपघात किती भीषण असेल याचा अंदाज व्हिडीओ पाहूनच बांधता येतो. सोशल मीडियावर अशा स्टंट्सचे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. @MotorOctane नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, हे फक्त भारतातच होऊ शकतं. यावर अनेक प्रतिक्रियाही येत आहेत. काहींनी ओव्हरलोड ट्रॅक्टर हा सुरक्षेसाठी कसा धोकायादयक आहे यावर भाष्य केलंय तर काहींनी अशा प्रकारांवर ताबडतोब बंदी घातली जावी कारण यामुळे इतर वाहनांनाही धोका निर्माण होऊ शकतो असं म्हंटलंय..

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-03-2023 at 11:01 IST