Man Lost Rs 2 Crore During Covid shares Viral Video : देशात थैमान माजवणारा कोरोना काळ आपण कधीच विसरणार नाही. या काळात कोणाचं आयुष्य थांबलं, कोणाची नोकरी गेली, शिक्षणव्यवस्था बदलली आदी अनेक गोष्टी बदलताना आपण यादरम्यान पाहिला. कोरोना काळात काही जणांचे हक्काचे व्यवसाय सुरु झाले पण, अनेक वर्ष उलटून गेली तरीही काही जण त्या काळातील नुकसानापासून अजूनही सावरले नाही आहेत. आज सोशल मीडियावर हेच दाखवणारा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

हिरव्या रंगाचा शर्ट घातलेला आणि पाठीवर सॅक घेतलेला एक माणूस, धावत्या मेट्रोच्या डब्यात उभा राहून एका व्यक्तीशी बोलत असतो. तो दुबईच्या इंटरनेट सिटीमधील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये प्रशासकीय पदावर काम करतो. मात्र, महामारीपूर्वी तो भारतात बांधकाम साहित्याचा एक यशस्वी व्यवसाय चालवत होता. मात्र कोविड-१९ मुळे झालेल्या २ कोटी रुपयांच्या नुकसानीमुळे एका व्यक्तीला आयुष्याची नव्याने सुरुवात करण्यास भाग पडले.

पुरुष घराचे शांत आधारस्तंभ (Viral Video)

पुरवठादारांना दिलेल्या रकमेमुळे त्याला जवळपास २ कोटी रुपयांचे नुकसान कसे झाले. या आर्थिक धक्क्याने त्याची सर्व बचत संपवली आणि त्याला पुन्हा शून्यातून सुरुवात करण्यास भाग पाडले. त्याच्या डोळ्यांत दुःख दिसत होतं, पण त्याच्या बोलण्यात अजिबात निराशा नव्हती. तो अजूनही पुढे जाण्याची ताकद ठेवून होता. जेव्हा त्याला विचारलं की तुला पुढे जाण्याची प्रेरणा कुठून मिळते, तेव्हा त्याने खूप साध्या शब्दांत उत्तर दिलं ‘आयुष्य थांबत नाही, ते पुढे चालतच राहतं”.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @Darshit2211_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी “मेहनती पुरुष हे घराचे शांत आधारस्तंभ असतात. ते आपल्या कष्टांमुळे संधी निर्माण करतात आणि स्वप्नांना वास्तवात उतरवतात. त्यांची शिस्त, जिद्द आणि समर्पण फक्त त्यांचं स्वतःचं भविष्य घडवत नाही, तर त्यांच्या आसपासच्या प्रत्येकाच्या आयुष्याला उंचावण्याचं काम करतं” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत…