man rides scooter while dog walking viral video : घरात पाळीव प्राणी ठेवणे म्हणजे त्याची अगदी लहान मुलासारखी काळजी घ्यावी लागते. त्यामुळे हे प्राणीही काळजी घेणाऱ्या आपल्या मालकावर खूप प्रेम करतात आणि तो घरी येण्याची आतुरतेने वाट पाहतात. कारण – अनेक प्राणीप्रेमी आई-बाबा लहान मुलांना घेऊन जातात तसं आपल्या पाळीव प्राण्यांना रोज सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी फिरायला घेऊन जातात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मालक आपल्या पाळीव प्राण्याला फिरायला घेऊन जाण्यासाठी अतिशय वेगळी आणि मजेशीर पद्धत वापरताना दिसत आहे, जी पाहून अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे.
लखनौमधील एका व्यक्तीने आपल्या श्वानाला फेरफटका मारायला तर घेऊन गेला. पण, त्याची पद्धत खूपच अनोखी होती. त्यांच्या या अनोख्या फेरफटका मारण्याच्या कृतीकडे एका अज्ञात माणसाचे लक्ष जाते. कॅमेरा मालकावर झूम होतो, जो एका हाताने श्वानाचा पट्टा धरून आरामात स्कूटर चालवत आहे आणि श्वान त्याच्या गाडीच्या बाजूने शांतपणे चालत आहे. स्वतः आपल्या पाळीव प्राण्याच्या बाजूने चालण्याऐवजी, तो माणूस आरामात हळू गतीने स्कूटर चालवलेले पाहून सगळेच आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहेत.’
हे दृश्य पाहून अनेकांना हसू आवरले नाही. विशेष म्हणजे, त्या व्यक्तीला या सगळ्या प्रकाराचे अजिबात नवल वाटत नव्हते. तो अगदी निवांतपणे आपल्या पाळीव श्वानाला फिरवत होता, जणू श्वानाला फिरायला नेण्याची हीच त्याची रोजची पद्धत आहे. पण, व्हिडीओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण स्कूटर फूटपाथवर चालवली जात होती, चालकाने हेल्मेट घातलेले दिसत नव्हते; त्याचबरोबर तो एका हातात श्वानाचा पट्टा आणि दुसऱ्या हाताने स्कूटर चालवत होता हे पाहून अनेकांना हे दृश्य गंभीर वाटले.
व्हिडीओ बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @adhyayan_pandey_jii या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “आता काकांनी श्वानाला फिरवायलाही स्कूटीचा शॉर्टकट शोधला आहे” ; अशी कमेंट केली आहे. त्यामुळे नेटकरी व्हिडीओ पाहून “असं फक्त लखनौमध्येच घडू शकते”, “श्वानाला फिरवायला स्कूटी नाही, तर श्वानाचं स्कूटीला फिरवतोय असं वाटतंय”, “पेट्रोलचे दर पाहून स्कूटीचं काम आता श्वानाकडे सोपवलंय बहुतेक”, “त्या श्वानापेक्षा त्या माणसालाच जास्त चालायची गरज आहे असं वाटतंय”, “चालायचा कंटाळा की आणखीन काय”; आदी अनेक मजेशीर कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत…
